Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्पार्क मिंडा फाऊंडेशन तर्फे दिव्यांगांसाठी आयोजित शिबिराला प्रतिसाद

स्पार्क मिंडा फाऊंडेशन तर्फे दिव्यांगांसाठी आयोजित शिबिराला प्रतिसाद

पुणे,29 फेब्रुवारी 2024 : आघाडीच्या ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट उत्पादक स्पार्क मिंडा ग्रुपचा सीएसआर विभाग असलेल्या स्पार्क मिंडा फाऊंडेशन (एसएमएफ) ने नुकतेच दिव्यांगांसाठी 7 दिवसीय शिबिर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये 1000 हून अधिक दिव्यांगांना यशस्वीरित्या बहुआयामी मदत दिली, ज्यामध्ये कृत्रिम अवयव, वॉकर, क्रॅचेस, हँड स्टिक्स, आणि यूडीआयडी रजिस्ट्रेशन, कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता यासारख्या सुलभ आणि सहाय्यक गोष्टींचा समावेश होता.2015 साली सुरू झालेला एसएमएफचा सक्षम उपक्रम आजवर 20,000 दिव्यांगांपर्यंत पोहचला आहे.

स्पार्क मिंडा ग्रुपमध्ये 1,000 हून अधिक दिव्यांगांना रोजगार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या आठ वर्षांत या ग्रुपने इंडोनेशिया, व्हिएतनाम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरमध्ये शिबिरांचे आयोजन केले आहे. 2030 पर्यंत, स्पार्क मिंडा फाउंडेशनने त्यांच्या सक्षम – दिव्यांगां चे सक्षमीकरण या कार्यक्रमांतर्गत 30,000 हून अधिक दिव्यांगांवर प्रभाव टाकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

सारिका मिंडा, चेअरपर्सन, स्पार्क मिंडा फाउंडेशन, म्हणाल्या, “जीवनात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने केलेल्या सहयोगी प्रयत्नामुळे नेहमीच चांगले परिणाम मिळतात. एसएमएफ चा प्रोजेक्ट सक्षम अनेकांच्या जीवनावर प्रभाव टाकत आहे. या प्रवासात आम्हाला पाठिंबा देणाऱ्या आमच्या भागीदारांचे आम्ही आभार मानतो आणि आम्ही अधिकाधिक जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आमची पोहोच वाढवत राहू आणि त्या दिशेने काम करत राहू.”

श्री. अशोक मिंडा, चेअरमन आणि ग्रुप चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, स्पार्क मिंडा ग्रुप, आपल्या उपस्थितीत कार्यक्रमाचे स्वागत करताना म्हणाले, “दृष्टीहीन असण्याने एखाद्याची पाहण्याची क्षमता हिरावून घेतली जात नाही. स्पार्क मिंडा संपूर्ण ग्रुपमध्ये विविधता आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी खरोखर वचनबद्ध आहे.”

स्पार्क मिंडाने सीआयआय-आयबीडीएन, असोचेम, जयपूर फूट (बीएमव्हीएसएस), सेक्टर कौन्सिल फॉर पीपल विथ डिसॅबिलिटीज, प्रहार, सार्थक, युथ 4 जॉब्स, इक्विटास आणि इतर अनेक एनजीओ यांसारख्या विविध संस्थांसोबत भागीदारी केली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये, टीमने भारतीय लष्कराच्या सहकार्याने भूसुरुंगांमुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी यशस्वीरित्या शिबिरे आयोजित केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments