Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोने इंडिया तर्फे अत्याधुनिक उत्पादन सुविधेमधून पहिल्या एस्केलेटरचे वितरण

कोने इंडिया तर्फे अत्याधुनिक उत्पादन सुविधेमधून पहिल्या एस्केलेटरचे वितरण

पुणे,1 मार्च 2024 : कोने कॉर्पोरेशनची संपूर्ण उपकंपनी असलेल्या कोने एलिव्हेटर्स इंडिया तर्फे भारतातील आपल्या अत्याधुनिक उत्पादन सुविधेमधून पहिल्या एस्केलेटरचे वितरण केल्याची घोषणा करण्यात आली.कोने चे मेक इन इंडिया धोरण आणि भारतातील उत्पादन प्रकल्पामधून जागतिक दर्जाचे सोल्युशन्स प्रदान करण्याची कटिबद्धता यातून प्रतिबिंबित होते.

याप्रसंगी बोलताना कोने इंडिया व्यवस्थापकीय संचालक अमित गोसेन म्हणाले की,भारतातील आमच्या जागतिक दर्जाच्या उत्पादन सुविधेतून एस्केलेटर्सचे यशस्वी वितरण करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.मेक इन इंडियासाठी आमची वचनबध्दता आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय प्रदान करण्याचा आमचा संकल्प यातून प्रवर्तित होतो.पुण्यातील आघाडीच्या रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असलेल्या एफ5 रिअल्टर्स ने दर्शविलेल्या विश्‍वास आणि समर्थनासाठी आम्ही कृतज्ञ आहोत.ही भागीदारी आमच्या उत्पादनांची नवीन रचना आणि कार्यक्षमतेला आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.पहिल्या एस्केलेटरच्या वितरणासह आम्हाला खात्री आहे की,गुणवत्ता,सुरक्षितता आणि विश्‍वासार्हता प्रदान करण्याच्या आमच्या वचनबध्दतेशी सुसंगत असलेली जागतिक दर्जाची उत्पादन श्रेणी आम्ही देऊ शकू.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments