तिसऱ्या तिमाहीत प्रबळ गतीसह देशांतर्गत घाऊक विक्रीमध्ये ४७ टक्के वाढीची नोंद
कालावधी
२०२४
२०२५
वाढ (टक्केवारीमध्ये)
डिसेंबर
१९८५
२९५२
४९ टक्के
तिसरी तिमाही
५७२३
८४२७
४७ टक्के
वायटीएम (एप्रिल ते डिसेंबर)
१९९११
२४९२०
२५ टक्के
पुणे, १ जानेवारी २०२६: फोर्स मोटर्स लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या व्हॅन उत्पादक आणि आघाडीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनीने कॅलेंडर वर्ष २०२५ ची उत्तम सांगता केली, जेथे डिसेंबर २०२५ मध्ये देशांतर्गत घाऊक विक्री डिसेंबर २०२४ मधील १,९८५ युनिट्सच्या तुलनेत ४९ टक्के वाढीसह २,९५२ युनिट्सपर्यंत पोहोचली. डिसेंबर शाश्वत विक्रीचा आणखी एक उत्तम महिना ठरला आहे, जेथे कंपनी प्रमुख गतीशीलता विभागांमध्ये आपली उपस्थिती दृढ करत आहे.
हा सकारात्मक ट्रेण्ड तिमाहीमध्ये देखील दिसण्यात आला, जेथे तिसऱ्या तिमाहीत देशांतर्गत घाऊक विक्री ४७ टक्के वाढीसह ५,७२३ युनिट्सवरून ८,४२७ युनिट्सपर्यंत पोहोचली. इअर-टू-मंथ (एप्रिल ते डिसेंबर २०२५) दरम्यान देशांतर्गत घाऊक विक्री २४,९२० युनिट्सपर्यंत पोहोचली, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २५ टक्के वाढ झाली.
या कामगिरीबाबत आपले मत व्यक्त कतर फोर्स मोटर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रसन फिरोदिया म्हणाले, ”यंदाचा डिसेंबर देखील आमच्यासाठी उत्तम महिना ठरला आहे आणि आमच्या मुलभूत प्लॅटफॉर्म्सवर सकारात्मक गती अत्यंत प्रेरणादायी आहे. आम्हाला टूर अँड ट्रॅव्हल विभागामध्ये सकारात्मक परिवर्तन दिसून येत आहे, ज्याला वाढती आंतरशहरीय वाहतूक आणि नवीन ताफा विस्तारीकरणाचे पाठबळ मिळत आहे. शालेय गतीशीलता देखील सुट्टीच्या कालावधीदरम्यान देखील स्थिर राहिल्या आहेत, ज्यामधून आम्ही नवीन वर्षाकडे वाटचाल करत असताना संस्थांचा आत्मविश्वास दिसून येतो.”
ते पुढे म्हणाले, ”शहरी व उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये अर्बनियाला मिळत असलेला प्रतिसाद, तसेच ट्रॅव्हलर श्रेणीच्या लक्षवेधक बाजारपेठ नेतृत्वामधून फोर्स मोटर्सवरील ग्राहकांचा विश्वास दिसून येतो. एकत्रित या ट्रेण्ड्समधून प्रबळ मागणी दिसून येते, ज्यामधून आम्हाला २०२६ कडे वाटचाल करताना भक्कम पाया मिळाला आहे.”


