Monday, October 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाजी सैनिकांना सुरक्षा सहकारी पदाकरिता नोकरीची संधी

माजी सैनिकांना सुरक्षा सहकारी पदाकरिता नोकरीची संधी

पुणे, दि. 2 (जिमाका, वृत्तसेवा):-‘गॅलंट फोर्स प्रायव्हेट लिमिटेड’ सुरक्षा सेवा पुरवठा कंपनीमार्फत शेवाळवाडी, सोलापूर रोड, पुणे येथे सुरक्षा सहकारी या पदाकरिता इच्छुक माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाच्या 020-45053610 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.

 

गॅलंट फोर्स प्रायव्हेट लिमिटेड ही रिअल इस्टेट व डेव्हलपर्स, बांधकाम क्षेत्र, उच्चभ्रू निवासी सोसायट्या, कॉर्पोरेट व माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, व्यावसायिक संकुले (मॉल्स), हॉस्पिटॅलिटी उद्योग, हॉटेल्स व रिसॉर्ट्स, उत्पादन व लॉजिस्टिक्स, फार्मा उद्योग, रुग्णालये, बँका, कॅश मॅनेजमेंट सेवा, शैक्षणिक संस्था, खासगी बंगले तसेच वैयक्तिक सुरक्षा सेवांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व गोवा आदी राज्यांमध्ये कार्यरत आहे.

 

सुरक्षा सहकारी या पदासाठी माजी सैनिकांचे वय 40 ते 55 वर्षे दरम्यान असावे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 24 हजार रुपये वेतन, तसेच भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळेल. बोनस, एलडब्ल्यूडब्ल्यू, एनपीएच व ग्रॅच्युइटीचे लाभ लागू झाल्यास ते अतिरिक्त देण्यात येतील. कामाची वेळ 8 तासांची असून महिन्यात 26 ते 27 दिवस कामकाज करावे लागणार आहे. वाजवी शुल्काच्या आधारे निवासाची सुविधाही उपलब्ध आहे, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

 

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments