Monday, October 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedवाहन क्रमांक आरक्षणासाठी ६ जानेवारीपासून फेसलेस सेवा सुरू

वाहन क्रमांक आरक्षणासाठी ६ जानेवारीपासून फेसलेस सेवा सुरू

पुणे, दि. 5: (जिमाका, वृत्तसेवा): प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे नवीन वाहनांसाठी आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची फेसलेस (ऑनलाईन) सेवा ६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजल्यापासून सुरू होणार आहे.

 

ही सेवा पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात कार्यान्वित असून, कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने शुल्क स्वीकारले जाणार नाही. नागरिकांनी ही सेवा घरबसल्या https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावरून वापर करता येईल.

 

फेसलेस सेवा कार्यान्वित असून, अर्जदार आधार लिंक मोबाईल क्रमांकाद्वारे ओटीपी घेऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. नव्याने सुरू होणाऱ्या एमएच झेडसी मालिकेतील पसंतीचे नोंदणी क्रमांक अर्जदारांना आरक्षित करता येतील. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments