Monday, October 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedडोळ्याला ईजा झालेल्या तीन बांधकाम मजुरांवर पीबीएमएच्या एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल येथे यशस्वी...

डोळ्याला ईजा झालेल्या तीन बांधकाम मजुरांवर पीबीएमएच्या एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल येथे यशस्वी कॉर्निओ-स्क्लेरल टेअर सुचरिंग प्रक्रिया

पुणे,6 जानेवारी 2026 : बांधकामाच्या ठिकाणी डोळ्याला ईजा झालेल्या तीन मजूरांवर पीबीएमएच्या एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल येथे यशस्वी कॉर्निओ-स्क्लेरल टेअर सुचरिंग ( दुखापत झालेल्या नेत्रपटलाला टाके घालण्याची प्रक्रिया) करण्यात आली. त्यातील दोघांना लोखंडी खिळ्यांमुळे तर तिसऱ्या मजुराला ग्राईंडिंगच्या कामादरम्यान वेगाने उडणाऱ्या कणांमुळे डोळ्याला दुखापत झाली होती. पीबीएमएच्या एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल येथील कॉर्निया विभागाच्या प्रमुख व नेत्रपेढीच्या संचालिका डॉ.शिल्पा जोशी यांच्या नेतृत्वाखाली कॉर्निया तज्ञ डॉ.स्नेहल घाडगे व डॉ.पूजा अंधारे यांसह डॉक्टरांच्या टीमने ही प्रक्रिया केली. हे सर्व मजुर उत्तर भारतातील असून विशीतले तरूण आहेत.

 

याबाबत अधिक माहिती देताना डॉ.शिल्पा जोशी म्हणाल्या की,बांधकाम कामाच्या दरम्यान या मजुरांना डोळ्याला ईजा झाली होती.अशा प्रकारची दुखापत ही अतिशय वेदनादायी असते,कारण धातूचे छोटे कण हे डोळ्याला वेगाने ईजा पोहचवितात.या तिघांनाही उजव्या डोळ्यात ईजा झाली होती.ईजा कितपत झाली आहे व छिद्राची व्याप्ती मोजण्यासाठी त्यांच्या स्लिट लॅम्प आणि इतर तपासण्या करण्यात आली.

 

डॉ.जोशी म्हणाल्या की,याचे निदान दोन टप्प्यात केले जाते. त्यातील एक म्हणजे कण डोळ्यात गेले आहेत की नाही हे पाहण्यासाठी एक्स-रे किंवा सीटी स्कॅन केले जाते,मात्र ही तपासणी नंतर केली जाऊ शकते.पण सर्वांत तातडीचा टप्पा म्हणजे जखम दुरूस्त करणे. निदानानंतर लगेचच रूग्णांना शस्त्रक्रिया विभागात नेण्यात आले आणि कार्निया-स्क्लेरल टिअर सुचरिंग प्रक्रिया करण्यात आली.

 

कार्निया-स्क्लेरल टिअर सुचरिंग ही अत्यंत नाजूक शस्त्रक्रिया असते.या प्रक्रियेच्या माध्यमातून डोळ्यातील पांढरा भाग (स्क्लेरा) आणि डोळ्याच्या समोर असलेल्या बुबुळाला झालेली दुखापत दुरूस्त करता येते. यामध्ये डोळ्याच्या बुबुळामध्ये झालेली जखम दुरूस्त करत अखंडता पुर्ववत करण्यासाठी,जलरोधक बंदिस्ती साधण्यासाठी आणि संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी त्या भागातील नेत्रपटलाच्या स्तरांची काळजीपूर्वक पुर्नरचना करत बारीक टाके वापरणे यासारख्या अचूक तंत्राच्या कौशल्याची आवश्यकता असते.

 

या तिघांपैकी दोन रूग्णांच्या डोळ्याची प्रकृती चांगली आहे,कारण दृश्य अक्षाच्या बाहेरील भागात या जखमा होत्या.डोळ्याला संसर्ग झाला नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी आणि नियमितपणे पुढील तपासणीसाठी रुग्णालयात येण्याची गरज आहे. 6 ते 8 आठवड्यानंतर टाके काढले जातील. त्यानंतर दृष्टी सुधारण्यासाठी चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सची गरज भासू शकते. तिसऱ्या रूग्णाच्या बुबुळाच्या मध्यभागी कॉर्नियाला इजा झाली असून भविष्यात केरेटोप्लास्टी (कॉर्निया प्रत्यारोपण) शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते.

 

डोळ्याला होणारी इजा ही तातडीची स्थिती असते आणि अशा वेळेस योग्य उपचार मिळण्यासाठी बहुशाखीय दृष्टीकोन आणि योग्य व्यवस्थापनाची गरज असते,म्हणूनच अशा तातडीच्या स्थितीत रूग्णांना जवळच्या टर्शरी आय केअर हॉस्पिटलमध्ये तातडीने घेऊन जाणे गरजेचे आहे,असे मत डॉ.जोशी यांनी व्यक्त केले.तसेच हॉस्पिटलमध्ये पोहचण्यात दिरंगाई झाली तर संसर्गाचा आणि पुढील गुंतागुंतीचा धोका वाढू शकतो.

 

पुण्यासारख्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरांमध्ये नेहमीच बांधकामाची कामे चालू राहणार.म्हणूनच कामाच्या ठिकाणी नेत्र सुरक्षेबाबत जागरूकता आवश्यक असते.अशा ठिकाणी काम करणारी लोकं ही सहसा परराज्यातून येतात.साहजिकच ही लोकं गरीब असतात.त्यांच्याकडे विमा नसतो आणि कुठल्याही सरकारी आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य कागदपत्रे देखील नसतात.

 

पीबीएमएच्या एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ.राहुल देशपांडे म्हणाले की, विशीच्या वयातील तरूणांची दृष्टी परत मिळण्यास मदत करणाऱ्या आमच्या बहुवैद्यकीय टीमच्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो. वैद्यकीय तज्ञांसोबतच सहाय्यक कर्मचाऱ्यांनी एमपीजेएवाय योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया तत्काळ पूर्ण केली आणि कागदपत्रे नसलेल्या तिसऱ्या तरूणासाठी निधी मिळवण्यासाठी समन्वय साधला. अत्याधुनिक सुविधा व उपकरणे,गुंतागुंतीच्या स्थितींचे दैनंदिन व्यवस्थापन करणारे कुशल डॉक्टर्स आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या तत्पर प्रयत्नांमुळे रूग्णांसाठी वेळेत व सर्वोत्तम उपचार देण्यास आम्ही

सक्षम आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments