पिंपरी, दि. ११ जानेवारी २०२६ :- “जय जवान जय किसान” ची क्रांतिकारी घोषणा करणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्री हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक होते असे प्रतिपादन उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारती मधील माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
लाल बहादूर शास्री यांचे राहणीमान अतिशय साधे होते. त्यांनी सामाजिक कार्यासाठी आपले जीवन समर्पित केले. नम्रता, दृढ विश्वास आणि निर्णय क्षमतेमुळे ते जनमानसात लोकप्रिय होते असे उप आयुक्त अण्णा बोदडे म्हणाले
.


