Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedटॉर्क २०२६ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात बीएनसीए संघाला विजेतेपद

टॉर्क २०२६ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात बीएनसीए संघाला विजेतेपद

पुणे, 12 जानेवारी 2026 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमेन (बीएनसीए) तर्फे आयोजित टॉर्क २०२६ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमेन (बीएनसीए) संघाने, तर, मुलांच्या गटात सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पुणे संघाने विजेतेपद संपादन केले.

 

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आवारातील मैदानावर ३ ते ५ जानेवारी २०२६ दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम लढतीत मुलींच्या गटात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमेन (बीएनसीए) संघाने पी. व्ही. पी. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाचा 15-09 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.

 

मुलांच्या गटात सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पुणे संघाने संघाने भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाचा 15-11 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

 

या स्पर्धेत पुणे शहरातील आर्किटेक्चर व डिझाईन महाविद्यालयांचे एकूण 10 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन बीएनसीएचे उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्राध्यापक उमेश चव्हाण यांनी संपूर्ण स्पर्धांचे आयोजन उत्कृष्ट आणि यशस्वी पद्धतीने केले.

 

स्पर्धेतील विजेत्या संघांना करंडक, प्रमाणपत्र, पदके व रु. १२,००० रोख रक्कम, तर उपविजेत्या संघांना करंडक, प्रमाणपत्र, पदके व रु. ८,००० रोख रक्कम प्रदान करण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे प्रा. अभय पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले.

 

याप्रसंगी बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांनी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आयोजन समिती, स्वयंसेवक आणि खेळाडूंना प्रोत्साहन देत, संघभावना, शिस्त आणि सातत्य हे यशाचे खरे सूत्र असल्याचे अधोरेखित केले.

 

सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून बीएनसीए मधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एन एस एस) अंतर्गत जनकल्याण रक्तपेढीच्या मदतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थिनी, प्राध्यापक व कर्मचारी मिळून 52 जणांनी रक्तदान केले. रक्तदानाची संकल्पना प्रा महेश बांगड यांची असून त्त्यांच्यासह एन एस एस प्रमुख डॉ अमिता प्रधान आणि जनकल्याण रक्तपेढीचे डॉ कांबळे यावेळी उपस्थि

त होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments