पुणे, १३ जानेवारी २०२६: टॅली सोल्यूशन्स प्रा. लि. या भारतातील आघाडीच्या व्यवसाय ऑटोमेशन सॉफ्टवेअर प्रदाता कंपनीने आज टॅलीप्राइम रीलीज ७.० च्या लाँचची घोषणा केली, ज्यासह टॅलीप्राइम प्लॅटफॉर्मच्या प्रवासाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. स्थापनेपासून टॅलीप्राइम स्पष्ट उद्देशासह डिझाइन करण्यात आले आहे, ते म्हणजे एमएसएमईंसाठी डिजिटायझेशन प्रक्रिया सोपी, विश्वसनीय आणि अत्यंत उपयुक्त करणे. हे रिलीज अधिक सखोल बँकिंग एकत्रीकरण, स्मार्ट ऑटोमेशन आणि डेटा सुरक्षिततेतील महत्त्वपूर्ण सुधारणांना एकत्र आणते आणि उद्योजकांना अधिक सुसंगत व कनेक्टेड अनुभव प्रदान करते.
गेल्या काही वर्षांत टॅलीप्राइमने व्यवसायांना ई-इनव्हॉइसिंग आणि ई-वे बिलपासून जीएसटी अनुपालन आणि दैनंदिन आर्थिक व्यवहारांपर्यंत भारतातील वेगाने बदलणाऱ्या डिजिटल वातावरणात आपला मार्ग सुकर करण्यासाठी मदत केली आहे. कनेक्टेड बँकिंग आणि टॅलीप्राइम क्लाउड अॅक्सेस यासारख्या वैशिष्ट्यांमुळे उद्योजक कुठूनही काम करू शकतात, सुरक्षितपणे व्यवहार करू शकतात आणि बाह्य यंत्रणांशी संलग्न होऊ शकतात.
रीलीज ७.० या ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाला अधिक प्रबळ करते. तसेच हे रीलीज एमएसएमई दैनंदिन व्यवहारांसाठी अवलंबून असलेले मुलभूत आधारस्तंभ सातत्यता, सुस्पष्टता आणि नियंत्रण यांना देखील अधिक दृढ करते. एसबीआय व अॅक्सिस बँकेसोबत प्रबळ सहयोगामुळे आता एमएसएमईंना पेमेंट्सचे व्यवस्थापन करणे, रिअल टाइममध्ये ताळेबंद व स्टेटमेंट्स मिळवणे आणि त्वरित व्यवहारांमध्ये ताळमेळ राखणे शक्य झाले आहे. या सुधारणांमुळे दैनंदिन आर्थिक व्यवहार अधिक गतीशील, पारदर्शक आणि विश्वसनीय झाले आहेत.
टॅलीचा सहयोगावर आधारित दृष्टिकोन एनपीसीआय भारत बिलपे लिमिटेडसोबत डिझाइन केलेल्या भारत कनेक्ट फॉर बिझनेसद्वारे अधिक प्रबळ होत आहे. ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील स्वयंचलित इनव्हॉइस देवाणघेवाण आणि पेमेंट लिंकेजमुळे एमएसएमई त्यांच्या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न अधिक सोपे करू शकतात आणि आपले रिसीव्हेबल्स (येणे रक्कम) व पेयेबल्स (देणे रक्कम) व्यवहार अधिक अचूकपणे करू शकतात.
रिलीज ७.० मध्ये टॅलीड्राइव्हचा प्रगत अनुभव देखील सादर करण्यात आला आहे, जे व्यवसायाचा डेटा अधिक सुरक्षित आणि अधिक विश्वासार्ह ठेवते. टॅलीड्राइव्हमध्ये सुधारित एन्क्रिप्शन, प्रामाणिकपणाबाबत अधिक सक्षम चाचणी आणि डेटा पूर्णपणे व्यवसायाच्या नियंत्रणात राहील या डिझाइन तत्त्वाचा समावेश आहे. यासह टॅलीचा दीर्घकालीन विश्वास दिसून येतो की, कनेक्टेड वर्कफ्लोमुळे गोपनीयतेसंदर्भात कधीच तडजोड होऊ शकत नाही. उद्योजकांना आपला डेटा सुरक्षित आहे, डेटाचा बॅकअप घेतला गेला आहे आणि डेटा कधीही उपलब्ध होऊ शकतो, याची खात्री मिळते. ज्यामुळे उद्योजक आता आत्मविश्वासाने डिजिटल पद्धतींचा अवलंब करू शकतात.
या महत्त्वपूर्ण टप्प्याबाबत मत व्यक्त करत टॅली सोल्यूशन्सचे व्यवस्थापकीय संचालक तेजस गोएंक म्हणाले:
”गेल्या पाच वर्षांत टॅलीप्राइमने आपल्या कनेक्टेड क्षमता सतत वाढवल्या आहेत, तसेच व्यवसायांच्या अनुपालन, बँकिंग आणि दैनंदिन कामकाज करण्याच्या पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली आहे. टॅलीप्राइम ७.० या प्रवासाचा विस्तार आहे, ज्यामध्ये स्मार्ट ऑटोमेशन, सुलभ बँकिंग व्यवहार आणि प्रगत गोपनीयता वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामधून आमचा विश्वास दिसून येतो की, आजच्या व्यवसायांना गुंतागुंतीचे नाही तर कनेक्टेड डिजिटायझेशन पाहिजे. हे रिलीज आम्ही विकसित करत असलेल्या परिसंस्थेला अधिक प्रबळ करते, ज्यामुळे व्यवसायांना अधिक सातत्याने, पारदर्शकपणे आणि आत्मविश्वासाने काम करण्यास मदत होईल.”
रिलीज ७.०च्या माध्यमातून टॅलीने सुरक्षित, सर्वोत्तम आणि सखोलपणे कनेक्टेड प्लॅटफॉर्म तयार करण्याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली आहे. हा प्लॅटफॉर्म एमएसएमई उद्योजकांना वेळेवर निर्णय घेण्यास, कामकाजात सातत्यता राखण्यास आणि भारतातील डिजिटल परिसंस्थेशी सुसंगत राहण्यास मदत करतो. या अपडेट्समुळे अनुपालन, बँकिंग, पेमेंट आणि रिपोर्टिंग यांमधील कनेक्टेड सेवा अधिक सुसंगतपणे काम करतील. यामुळे एमएसएमई आपला व्यवसाय अधिक सुलभतेने आणि स्पष्टतेने करू शकतील.
टॅलीप्राइम रीलीज ७.० सक्रिय परवाना असलेल्या सर्व विद्यमान टॅलीप्राइम ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.


