Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedकृषीगती तर्फे शेतीसाठी तंत्रज्ञान-केंद्रित कृषीतंत्रज्ञान सोल्‍यूशन्‍स

कृषीगती तर्फे शेतीसाठी तंत्रज्ञान-केंद्रित कृषीतंत्रज्ञान सोल्‍यूशन्‍स

पुणे, नोव्‍हेंबर २०२५: कृषीगती प्रायव्‍हेट लिमिटेड ही कृषीतंत्रज्ञान क्षेत्रातील उदयोन्‍मुख कंपनी आंतरमशागत काम व अचूक शेतीसाठी नाविन्‍यपूर्ण, तंत्रज्ञान-केंद्रित सोल्‍यूशन्‍सच्‍या माध्‍यमातून आधुनिक कृषी पद्धतींमध्‍ये परिवर्तन घडवून आणत आहे. २०२१ मध्‍ये तुकाराम सोनावणे यांनी स्‍थापना केलेली ही पुण्‍यातील स्‍टार्टअप प्रगत यंत्रणेच्‍या माध्‍यमातून कृषी उत्‍पादकता, कार्यक्षमता आणि स्थिरता वाढवण्‍याप्रती कटिबद्ध आहे.

 

अधिक परिश्रम कराव्‍या लागणाऱ्या पांरपारिक पद्धतींमुळे शेतकऱ्यांना अनेक आव्‍हानांचा सामना करावा लागतो. ही बाब ओळखत कृषीगतीने स्‍मार्ट कृषी उपकरणांची श्रेणी डिझाइन केली आहे, जे आंतरमशागत कामाला अधिक कार्यक्षम व किफायतशीर बनवतात. कंपनीच्‍या ऑफरिंग्‍ज बी२बी व बी२सी विभागांच्‍या गरजांची पूर्तता करतात, तसेच भारतभरातील अल्‍पभूधारक शेतकरी, कृषी व्‍यवसाय आणि कृषी उपकरण विक्रेत्‍यांच्‍या गरजांची देखील पूर्तता करतात.

 

कृषीगतीने शेतकरी-केंद्रित नाविन्‍यतेवर दिलेला फोकस आणि दैनंदिन कृषी पद्धतींमध्‍ये आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश केल्‍याने त्‍यांच्‍या विकासाला गती मिळाली आहे. कंपनीच्‍या मशिन्‍स शेतीसाठी करावे लागणारे परिश्रम कमी करण्‍यासाठी, शेतकामामधील अचूकता वाढवण्‍यासाठी आणि विविध पीकांची लागवड करण्‍यास मदत करण्यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत, ज्‍यामुळे शेतकऱ्यांना उत्‍पादन वाढवण्यासोबत संसाधनांचा सानुकूल वापर करता येईल.

 

टी-हबसोबत सहयोगाने कोटक महिंद्रा बँकेच्‍या कोटक बिझलॅब्‍स अॅक्‍सेलरेटर प्रोग्राममध्‍ये सहभाग कृषीगतीच्‍या प्रवासामधील महत्त्वपूर्ण टप्‍पा ठरला. उद्योगामधील तज्ञांच्‍या मार्गदर्शनांतर्गत संस्‍थापक तुकाराम सोनावणे आणि त्‍यांच्‍या टीमने आपले व्‍यवसाय मॉडेल निपुण केले, शेतकाम करण्‍यामध्‍ये अधिक शिस्‍तबद्धता आणली आणि अधिक धोरणात्‍मक व विकासात्‍मक दृष्टिकोनासह विकास केला. प्रोग्राममध्‍ये मिळालेल्‍या मार्गदर्शनाने त्‍यांना साहसी, माहितीपूर्ण निर्णय घेण्‍यास आणि बाजारपेठेतील वास्‍तविकतेशी त्‍वरित जुळून जाण्‍यास प्रेरित केले, ज्‍यामुळे दीर्घकालीन विकासासाठी प्रबळ पाया रचण्‍यात आला.

 

भारतातील कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्‍याच्‍या आपल्‍या मिशनमधून प्रेरित कृषीगती नाविन्‍यता आणत आहे, जी तंत्रज्ञान व पारंपारिक कृषी पद्धतींमधील तफावत दूर करते, तसेच शेतकऱ्यांना सर्वोत्तम साधनांसह सक्षम करत आहे, जी अचूक शेती सहजसाध्य, किफायतशीर व शाश्वत करतात.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments