Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedतृतीयपंथीयांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक सुरु

तृतीयपंथीयांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक सुरु

पुणे, दि. 13 (जिमाका, वृत्तसेवा) : केंद्र शासनाचे तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा 2019 व नियम 2020 नुसार तृतीयपंथी समाजातील व्यक्तींसाठी केंद्र शासनामार्फत स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले आहे, या पोर्टलवर तृतीयपंथीयांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक – 14427 देण्यात आला आहे. या हेल्पलाइन क्रमांकाद्वारे तृतीयपंथीयांना योजनाबाबतची माहिती, अर्ज प्रक्रिये संबंधी मार्गदर्शन, अडचणींचे निराकरण तसेच तक्रारी नोंदवण्यासाठी तृतीयपंथी हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

 

तरी तृतीयपंथीयांनी राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन विशाल लोंढे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे यांनी केले आहे

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments