Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedविद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात करियर घडवा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे एमआयटी डब्ल्यूपीयूच्या विद्यार्थ्याना...

विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात करियर घडवा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे एमआयटी डब्ल्यूपीयूच्या विद्यार्थ्याना आवाहन पुणे ग्रँड चॅलेंज टूर मुळे शहरात सायकल स्पर्धा

पुणे, दि. १३ जानेवारी : “पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेमुळे पुण्याचे नाव पर्यटनाच्या जागतिक नकाशावर पोहचणार आहे. ऑलिम्पिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जागतिक दर्जाचे खेळाडू तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणे. क्रीडा शहर विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करून गुंतवणूक आकर्षित करणार आहे. तसेच हजारो विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होऊन भविष्यात क्रीडा क्षेत्रामध्ये करियर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विद्यार्थ्यांना केले.

पुणे जिल्हा प्रशासन व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संयुक्त विद्यमाने कोथरुड येथील कॅम्पसमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, स्टूडेंट अफियेर्सचे डीन डॉ. हितेश जोशी, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. वैभव वाघ आणि सहयोगी संचालक मंगेश लटपटे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले,“ या कार्यक्रमासाठी ६ महिन्यांच्या कालावधीत जागतिक दर्जांचे रस्ते तयार करणार आहेत. स्पर्धेसाठी ४३७ पेक्षा अधिक किमी सायकल मार्ग तयार केला जाणार. तसेच या मध्ये ३० देश सहभागी असून १७० आंतरराष्ट्रीय सायकलस्वार सहभागी होणार आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की नियोजन आणि अंमलबजावणी स्वयंसेवक म्हणून क्रीडा कार्यक्रमात सहभागी व्हा. त्यामुळे विद्यार्थ्याना क्रीडा व्यवस्थापनाचा अनुभव मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.”

जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, सायकल स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात पर्यटन तसेच मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि ग्रामीण भागात पर्यटन, तसेच मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळावी असा प्रयत्न आहे. यास्पर्धेतून अर्थव्यवस्थेला चालना मिळावी हा उद्देश आहे. या सायकल स्पर्धेवर संपूर्ण पणे शासनाचे नियंत्रण आहे. पालकमंत्री, जिल्हा प्रशासनाचेच त्यावर नियंत्रण राहणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने शहरातील पुणे मनपाच्या सहकार्याने शेकडो किमी लांबीचे सायकल ट्रॅक उभारण्याचे विचाराधीन आहे.”

डुडी म्हणाले, पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १९ ते २३ जानेवारी या कालावधीत पुणे ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होणार आहे. त्याबाबत त्यांनी सांगितले की पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे गड, किल्ले, धरणे, नद्या, डोंगररांगा, जैवविविधता, वनसंपदा प्राणी, संस्कृती बरोबरच ऐतिहासिक, धार्मिक स्थळे या स्पर्धेच्या निमित्ताने जागतिक नकाशावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.”

या कार्यक्रमाला ४०० विद्यार्थी उपस्थित होते. तसेच, ऑनलाईन हजारो विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

स्वागत पर भाषण डॉ. वैभव वाघ यांनी केले. मंगेश लटपटे यांनी आभार मा

नले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments