Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedफर्स्‍ट-एव्‍हर कोक स्‍टुडिओ भारत लाइव्‍हचे दिल्‍ली आणि गुवाहाटीमध्‍ये पदार्पण

फर्स्‍ट-एव्‍हर कोक स्‍टुडिओ भारत लाइव्‍हचे दिल्‍ली आणि गुवाहाटीमध्‍ये पदार्पण

१५ जानेवारी २०२६: कोका-कोलाने फर्स्‍ट-एव्‍हर कोक स्‍टुडिओ भारत लाइव्‍हच्‍या लाँचसह भारतातील सांस्‍कृतिक प्रवासामध्‍ये मोठा टप्‍पा गाठला, जेथे आपल्‍या सुप्रसिद्ध म्‍युझिक प्‍लॅटफॉर्मला पहिल्‍यांदाच स्क्रिनवरून मंचापर्यंत आणले. कोक स्‍टुडिओ भारतचे मोठ्या प्रमाणात लाइव्‍ह विस्‍तारीकरण म्‍हणून डिझाइन करण्‍यात आलेल्‍या या उपक्रमामध्‍ये आर्टिस्‍ट्स, प्रेक्षक व समुदाय एकत्र आले, जेथे त्‍यांनी एकत्रित संस्‍मरणीय क्षणांच्‍या माध्‍यमातून भारताच्‍या वैविध्‍यपूर्ण संगीत वारशाला साजरे केले.

 

कोक स्‍टुडिओ भारत लाइव्‍हचे पदार्पणीय पर्व १० जानेवारी रोजी दिल्‍लीमध्‍ये आणि १३ जानेवारी रोजी गुवाहाटीमध्‍ये सुरू झाले. या दोन्‍ही दिवशी प्‍लॅटफॉर्मच्‍या तत्त्वाचे विशिष्‍ट पैलू पाहायला मिळाले, जे प्रादेशिक कलेमध्‍ये सामावलेले असण्‍यासोबत देशभरातील प्रेक्षकांशी संलग्‍न आहेत.

 

कोका-कोला इंडिया आणि साऊथवेस्‍ट एशियाचे आयएमएक्‍स (इंटीग्रेटेड मार्केटिंग एक्‍स्‍पीरिअन्‍स) प्रमुख शंतनू गंगाणे म्‍हणाले, ”कोक स्‍टुडिओ भारत लाइव्‍ह स्क्रिनवरून मंचापर्यंत येण्‍याच्‍या दिशेने प्‍लॅटफॉर्मचे पहिले पाऊल ठरले आहे. लाइव्‍ह परफॉर्मन्‍समध्‍ये संगीतासोबत फूडचा आस्‍वाद आणि क्रीडाचा आनंद मिळाला. दिल्‍ली व गुवाहाटीमध्‍ये ग्राहकांनी उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला आणि शो पाहण्‍यासोबत संस्‍मरणीय क्षण निर्माण केले. आर्टिस्‍टसोबत सहयोग आणि रीलीज न झालेल्‍या गाण्‍यांच्‍या प्रीव्‍ह्यूपासून मंचावर आर्टिस्‍ट्ससोबत चाहते सामील होण्‍यापर्यंत या दोन दिवसांमध्‍ये अद्वितीय संबंध निर्माण झाले. दोन्‍ही शहरांमधून मिळालेल्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादामधून दिसून आले की, सहयोगाने अनुभव दिल्‍यास कोक स्‍टुडिओ भारत चाहत्‍यांशी अधिक संलग्‍न होत राहिल.”

 

दिल्‍ली: जेथे लाइव्‍ह प्रवास सुरू झाला

 

नवी दिल्‍लीमध्‍ये लाइव्‍ह प्रवासाला सुरूवात झाली, एनएसआयसी ग्राऊंड्स, ओखला येथे लाइव्‍ह परफॉर्मन्‍सचे आयोजन करण्‍यात आले, जेथे कोक स्‍टुडिओ भारत लाइव्‍ह पहिल्‍यांदाच प्रेक्षकांसमोर थेट सादर करण्‍यात आले. या संध्‍याकार्यक्रमामध्‍ये संगीतप्रेमी एकत्र आले, ज्‍यांनी भारतातील सुप्रसिद्ध गायकांच्‍या संगीताचा आनंद घेतला, ज्‍यामध्‍ये भावना, कथानक आणि आधुनिक स्‍वरूप सामावलेले होते. श्रेया घोषाल, आदित्‍य रिखारी, रश्‍मीत कौर, दिव्‍यम आणि ख्‍वाब यांच्‍या परफॉर्मन्‍सनी उत्‍साहपूर्ण वातावरण निर्माण केले, ज्‍यामधून दिसून आले की आजचे संगीत शैली, पिढ्या व भौगोलिक क्षेत्रांपलीकडे जाते.

 

विशेषत: चाहत्‍यांसाठी निर्माण करण्‍यात आलेल्‍या क्षणामध्‍ये आदित्‍य रिखारी यांनी मंचावर लाइव्‍ह रीलीज न झालेले कोक स्‍टुडिओ भारत गाणे सादर करत चाहत्‍यांना अचंबित केले, जेथे लाइव्‍ह परफॉर्मन्‍समध्‍ये या मधुरमय गाण्‍याला पहिल्‍यांदाच सादर करण्‍यात आले. दिल्‍लीमधील या शोदरम्‍यान अद्वितीय क्‍लायमॅक्‍स पाहायला मिळाला, जेथे श्रेया घोषाल यांच्‍यासोबत रश्‍मीत कौर, आदिल्‍य रिखारी, दिव्‍यम व ख्‍वाब यांनी मधुरमय कोक स्‍टुडिओ भारत गाणी सादर केली. या अनुभवामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करत निवडक चाहत्‍यांना मंचावर आमंत्रित करण्‍यात आले, ज्‍यांनी श्रेया घोषाल यांच्‍यासोबत गाणे गाण्‍याचा आनंद घेतला, ज्‍यासह कॉन्‍सर्टमध्‍ये अद्वितीय साजरीकरणाचा अनुभव मिळाला.

 

गुवाहाटी: ईशान्‍येकडील गायकांना प्रकाशझोतात आणले

 

राजधानी शहराकडून हा प्रवास गुवाहाटीमध्‍ये आला, जेथे कोक स्‍टुडिओ भारत लाइव्‍हने प्रादेशिक कलेला सादर केले, तसेच ईशान्‍येमधील गायकांना प्रकाशझोतात आणले. एसीए स्‍टेडियम, बारसापरा येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या गुवाहाटी एडिशनमध्‍ये प्रादेशिक संगीत व गायकांसह क्षण साजरा करण्‍यात आला, जेथे आर्टिस्‍ट्सनी स्‍थानिक संस्‍कृतीला सादर केले.

 

अनुव जैन, शंकुराज कोनवार, रिटो रिबा व अनुष्‍का मस्‍की यांच्‍या परफॉर्मन्‍सनी उत्‍साहवर्धक वातावरण निर्माण केले, जेथे आधुनिक संगीतासह प्रादेशिक कलेचे संयोजन पाहायला मिळाले. आर्टिस्‍ट्स अद्वितीय भावनेसह प्रेक्षकांशी संलग्‍न झाले, ज्‍यासह भारतातील संगीत वैविध्‍यतेप्रती कोक स्‍टुडिओ भारत लाइव्‍हची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. महत्वपूर्ण क्षणामध्‍ये सर्व आर्टिस्‍ट्स मंचावर एकत्र आले आणि त्‍यांनी एकत्रित ‘अर्ज किया है’ गाणे सादर केले. यानंतर मंचावर निवडक चाहत्‍यांना आमंत्रित करण्‍यात आले आणि अनप्‍लग बॅकस्‍टेज सत्रामध्‍ये त्‍यांच्‍यासोबत संवाद साधण्‍यात आला. सोशल व प्रत्‍यक्ष सहभागांच्‍या माध्‍यमातून चाहत्‍यांची निवड करण्‍यात आली, ज्‍यामुळे हा चाहत्‍यांसोबत संस्‍मरणीय लाइव्‍ह अनुभव ठरला.

 

क्रीडा व संगीत अनुभवासह कोक स्‍टुडिओ भारत लाइव्‍हमध्‍ये विचारपूर्वक डिझाइन केलेले विविध पाककलांचे फूड क्षेत्र देखील होते, जेथे चाहत्‍यांनी फूड व कोकचा आस्‍वाद घेतला, ज्‍यासह हा लाइव्‍ह शो परिपूर्ण सांस्‍कृतिक व सोशल अनुभव देणारा ठरला.

 

जबाबदार साजरीकरणाप्रती क

टिबद्धता

 

कोका-कोलाइंडियाने कोक स्‍टुडिओ भारत लाइव्‍हमध्‍ये आपला #MaidaanSaaf उपक्रम आणला. कर्मचारी असलेले रिसायकलिंग स्‍टेशन्‍स, प्रशिक्षित स्‍वयंसेवक आणि साफसफाईसंदर्भात प्रत्‍यक्ष मार्गदर्शनासह या उपक्रमांतर्गत कचरा गोळा करण्‍यासोबत वेगळा करण्‍यात आला. यामधून निदर्शनास आले की, मोठ्या प्रमाणात सार्वजनिक साजरीकरण देखील जबाबदारीने आयोजित करता येऊ शकतात.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments