Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedलेनोव्हो तर्फे भारतात नेक्स्ट जनरेशन जीसीसी साठी फुलस्टॅक सेवा संचाची घोषणा ·...

लेनोव्हो तर्फे भारतात नेक्स्ट जनरेशन जीसीसी साठी फुलस्टॅक सेवा संचाची घोषणा · डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ते डिजिटल ऑर्केस्ट्रेशन,लेनोव्हो तर्फे एआय चलित जीसीसी कामकाजासाठी व्यवस्थापित सेवा,एआय सज्ज पायाभूत सुविधा प्रदान

पुणे,22 जानेवारी 2026 : प्लॅटफॉर्म इनोव्हेशन,एआय चलित परिवर्तन आणि सिक्युरिटी फर्स्ट इंजिनिअरींग यांसाठी ऑर्केस्ट्रेशन हब्स म्हणून झपाट्याने विकसित होत असलेल्या भारतातील ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स (जीसीसी) साठी लेनोव्हो ने फुलस्टॅक सेवा संचाची घोषणा केली आहे.डिजिटल ट्रान्सफॉमेशन ते डिजिटल ऑर्केस्ट्रेशनचा प्रवास करत असलेल्या जीसीसी केंद्रांच्या तंत्रज्ञान विषयक गरजा अधिक स्तरित,सुरक्षित आणि अनुकूलित होत आहेत.या गरजा एज ते क्लाऊड व इन्फ्रास्ट्रक्चर ते इंटेलिजन्स पर्यंत पसरलेले आहे.

 

नुकताच लेनोव्हो ने केलेल्या सर्वेक्षणात एआयचा विस्तार,आधुनिक पायाभूत सुविधा,कार्यबलाची उत्पादकता,अनुपालन,सुरक्षितता आणि शाश्वतता या धोरणात्मक तंत्रज्ञान बदलांचे संकेत अधोरेखित झाले.हे महत्त्वपूर्ण बदल लक्षात घेता लेनोव्हो इंडिया या बदलांमध्ये सेवा देण्यासाठी सज्ज असून भारतातील 1600 हून अधिक जीसीसी केंद्रांसाठी तयार केलेल्या उह्ेशानुसार सेवा,फुलस्टॅक एआय सज्ज पायाभूत सुविधांद्वारे मोजता येण्याजोग्या गुंतवणुकीवर परतावा याच्याशी सुसंगत सेवा प्रदान करत आहे.

 

लेनोव्हो तर्फे एआय,पायाभूत सुविधा,कार्यबल आणि सुरक्षितता या सर्वांसाठी जीसीसी केंद्रांना पाठबळ देते.

 

· लेनोव्हो तर्फे व्यापक एआय विकासासाठी चालना – संपूर्ण एआय पायाभूत सुविधा आणि ट्रुस्केलचे लवचिक वापर प्रारूप यामुळे कुठल्याही मोठ्या गुंतवणूकीशिवाय जलद रितीने एआयचा वापर शक्य होतो.

 

· लेनोव्हो तर्फे जीसीसी आधुनिकीकरणाला पाठबळ – जगातील सर्वांत विश्वासार्ह पायाभूत सुविधांद्वारे व सिध्द आर्किटेक्चर आणि मजबूत इकोसिस्टीम सह एआय क्लाऊड आणि लीगसी प्रणालींच्या सह अस्तित्वासाठी डिझाईन केलेला एंडटूएंड एआय स्टॅक प्रदान करते.

 

· लेनोव्हो तर्फे कार्यबल उत्पादकतेला चालना – डिव्हाईसेस,पायाभूत सेवा व सुविधा,एआय पीसीज्‌‍ना पाठबळ,सुरक्षित डिजिटल कार्यस्थळे,एआय समर्थित कामकाज आणि सेवाचलित परिवर्तन यांसाठी पर्सनल व एंटरप्राईज एआयचे एकत्रीकरण करण्यात येते.

 

· जीसीसी अनुपालन व सुरक्षा गरजांसाठी लेनोव्हो तर्फे उपाय – रचनात्मक रित्या सुरक्षित व हार्डवेअर ते प्लॅटफॉर्म अंत:स्थापित केलेले इन्फ्रास्ट्रक्चर,सॉवरेन एआय,महत्त्वाचा डाटा स्थानिक पातळीवर सुरक्षित आणि विश्वासार्ह जागतिक व भारतीय फूटप्रिंटच्या माध्यमातून सेवा प्रदान.

 

· लेनोव्हो तर्फे शाश्वत एआय शक्य – कार्यक्षमतेसाठी उर्जा कार्यक्षम पायाभूत सुविधा,उच्च घनतेच्या एआय कामकाजासाठी नेपच्यून लिक्विड कुलिंग आणि ईएसजी उद्दिष्टांच्या दृष्टीने सस्टेनेबिलिटी व लाईफ सायकल सेवा प्रदान केल्या जातात.

 

लेनोव्हो एक जागतिक तंत्रज्ञानामध्ये आघाडीची कंपनी असून जगभरातील अभिनवता,उत्पादन आणि सेवांमध्ये वैविध्यपूर्ण आणि मजबूत ठसा आहे.जगभरात 30 हून अधिक उत्पादन प्रकल्प,जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर सेवा देण्याची क्षमता आणि गार्टनरकडून आशिया-पॅसिफिकमधील नंबर 1 पुरवठा साखळी म्हणून मिळालेली ओळख यामुळे लेनोव्हो अतुलनीय कार्यात्मक उत्कृष्टता प्रदान करते.कंपनीचे नाविन्यपूर्ण कार्य 18 जागतिक संशोधन व विकास प्रयोगशाळांमध्ये विस्तारीत आहे.बंगळुरू येथील सुविधा ही जागतिक स्तरावरील 4 महत्त्वपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन्स लॅब पैकी एक असून हायब्रिड एआय डिझाईन ते कार्यान्वयनाच्या प्रक्रियेपर्यंत अखंड सेवा प्रदान करते.या जागतिक स्तरावरील कार्याला ग्लोबल शेअर्ड सेंटरद्वारे बळकटी मिळते.यामध्ये नेटवर्क ऑपरेटिंग सेंटर (एनओसी) आणि सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर (एसओसी) याचे एकत्रीकरण झाले असून 180 बाजारपेठांमधील टाईमझोन्सनुसार 24X7 सेवा प्रदान केल्या जातात.दोन मुख्यालयांसह कामकाज असणाऱ्या,जागतिक स्तरावरील विस्तारित संशोधन आणि विकास केंद्र असणाऱ्या आणि भारतातील पुड्डीचेरी येथील दोन दशकांहून अधिक काळाचा स्थानिक अनुभव वापरून लेनोव्हो हे फुलस्टॅक हायब्रीड एआय सोल्युशन्सद्वारे जीसीसी कंपन्यांना त्यांच्या विकासाच्या प्रवासात सक्षम करण्यासाठी व भारतात झपाट्याने विकसित होणाऱ्या जीसीसी परिसंस्थेला पाठबळ देण्यासा

ठी सज्ज आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments