जुलाबामुळे होणाऱ्या डिहायड्रेशनसाठी ORSL™, तर दैनंदिन हायड्रेशनसाठी eRZL™
इलेक्ट्रोलाइट ड्रिंक्स पोर्टफोलिओमध्ये नवीन ब्रँड eRZL™चा शुभारंभ — सुधारित फॉर्म्युलेशनसह, जे जलद हायड्रेशन, 1.4 पट अधिक इलेक्ट्रोलाइट्स आणि 8 पट कमी साखर देते, त्याच आयकॉनिक चवीसह
नॅशनल, 27 जानेवारी 2026 — केनव्ह्यूने आज भारतात ‘कम्प्लीट हायड्रेशन’साठी दोन-ब्रँड धोरणाची घोषणा केली असून त्यात ORSL™ आणि eRZL™ यांचा समावेश आहे. डिहायड्रेशन ही वाढती सार्वजनिक आरोग्याची समस्या ठरत असताना, ही रणनीती जुलाबामुळे होणारे तसेच दैनंदिन डिहायड्रेशन — दोन्ही गरजा पूर्ण करणारे नाविन्यपूर्ण उपाय देऊन भारतातील हायड्रेशन श्रेणीतील कंपनीचे नेतृत्व अधिक मजबूत करते.
“डबल पॉवर फॉर कम्प्लीट हायड्रेशन” या ब्रँड धोरणाअंतर्गत, कंपनी ग्राहकांसाठी विज्ञानाधारित दोन हायड्रेशन ब्रँड — ORSL™ आणि eRZL™ — उपलब्ध करून देणार आहे.
• ORSL™ (औरसल™): ORSL™ आता कंपनीच्या ORS पोर्टफोलिओचे ब्रँड नाव असेल, जे जागतिक आरोग्य संघटनेच्या (W.H.O.) फॉर्म्युलावर आधारित असून जुलाबामुळे होणाऱ्या डिहायड्रेशनसाठी वापरले जाते. हे रेडी-टू-ड्रिंक आणि पावडर या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे.
• eRZL™ (एर्झिल™): जानेवारी 2026 पासून, eRZL™ हे कंपनीच्या विज्ञानाधारित इलेक्ट्रोलाइट ड्रिंक्स पोर्टफोलिओचे (पूर्वीचे ORSL™ इलेक्ट्रोलाइट ड्रिंक्स) नवीन ब्रँड नाव असेल. हे दैनंदिन हायड्रेशन तसेच थकवा व अशक्तपणातून सावरण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
eRZL™ — नवीन आणि सुधारित फॉर्म्युलेशन
विज्ञानाधारित हायड्रेशन सोल्यूशन्स देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला पुढे नेत, कंपनी eRZL™ हे नवीन व सुधारित फॉर्म्युलेशनसह लॉन्च करत आहे.
eRZL™ पाण्याच्या तुलनेत जलद हायड्रेशन देते. यामध्ये आधीच्या फॉर्म्युलेशनपेक्षा 1.4 पट अधिक इलेक्ट्रोलाइट्स आणि 8 पट कमी साखर आहे. हीट एक्झॉस्शन, स्नायूंचे आकडे (muscle cramps) यांसारख्या सौम्य ते मध्यम डिहायड्रेशनच्या स्थितीत किंवा थकवा व अशक्तपणा जाणवत असताना हे सहाय्यक (adjuvant) म्हणून कार्य करते.
दैनंदिन हायड्रेशनसाठी डिझाइन केलेले eRZL™ इलेक्ट्रोलाइट ड्रिंक सोडियम, पोटॅशियम आणि क्लोराईड हे तीन महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स, व्हिटॅमिन C आणि खऱ्या फळांच्या रसासह तयार केलेले आहे — जे चविष्ट, प्रभावी आणि guilt-free हायड्रेशन प्रदान करते.
नेतृत्वाची प्रतिक्रिया
कंपनीच्या दोन-ब्रँड हायड्रेशन धोरणावर भाष्य करताना, केनव्ह्यू इंडिया चे मॅनेजिंग डायरेक्टर मनीष आनंदानी म्हणाले,
“ग्राहकांच्या गरजांची सखोल समज आणि मजबूत वैज्ञानिक पाया यामुळे आम्ही अनेक वर्षांपासून हायड्रेशन श्रेणीत अग्रस्थानी आहोत. डिहायड्रेशन ही एक महत्त्वाची आरोग्य समस्या ठरत असताना, आम्ही आमचा हायड्रेशन पोर्टफोलिओ सातत्याने विकसित करत आहोत. या प्रवासात आणखी एक पाऊल टाकत, ORSL™ आणि eRZL™ या आमच्या वेगळ्या दोन-ब्रँड धोरणाचा शुभारंभ करताना आम्हाला आनंद होत आहे. भारतातील इलेक्ट्रोलाइट ड्रिंक श्रेणी वेगाने वाढत असून तिच्या मोठ्या संधींचा लाभ घेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आजारपण आणि दैनंदिन काळजी — दोन्ही स्तरांवर हायड्रेशनविषयी जागरूकता वाढवण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.”
उत्पादन व ग्राहक दृष्टिकोन
लॉन्च आणि सुधारित फॉर्म्युलेशनबाबत बोलताना, केनव्ह्यू इंडिया मधील सेल्फ केअर बिझनेस युनिट हेड प्रशांत शिंदे म्हणाले,
“अलीकडच्या काळात आरोग्य आणि वेलनेसचा कल झपाट्याने वाढला आहे. आज ग्राहक कमी साखर, कमी कॅलरी पर्यायांसोबतच आजारपणात किंवा थकवा जाणवत असताना पाण्यापेक्षा पुढे जाऊन खास हायड्रेशन सोल्यूशन्स शोधत आहेत. नवीन व सुधारित फॉर्म्युलेशनसह आलेले eRZL™ अशा वेळी ग्राहकांना लवकर बरे वाटण्यासाठी एक आरोग्यदायी हायड्रेशन पर्याय देते.”
वैद्यकीय दृष्टिकोन
केनव्ह्यू इंडिया मधील मेडिकल अँड सेफ्टी सायन्सेसचे प्रमुख डॉ. निखिल बांगले म्हणाले,
“जुलाबामुळे होणाऱ्या डिहायड्रेशनबाबत जागरूकता असली तरी, नॉन-डायरियल किंवा दैनंदिन डिहायड्रेशनकडे अनेकदा दुर्लक्ष होते — विशेषतः वाढती उष्णता, आर्द्रता आणि शारीरिक ताण याच्या पार्श्वभूमीवर. आज रिहायड्रेशन फक्त पाणी किंवा घरगुती उपायांपुरते मर्यादित राहिलेले नाही; विज्ञानाधारित प्रगत उपायांची गरज आहे. आजारपण तसेच दैनंदिन हायड्रेशनसाठी योग्य सोल्यूशन्सबाबत जागरूकता वाढवण्याची तातडीची गरज आहे. इलेक्ट्रोलाइट ड्रिंक्सची निवड ही इलेक्ट्रोलाइट्स, आवश्यक पोषक घटक आणि उर्जेच्या योग्य प्रमाणावर आधारित असावी, जेणेकरून जलद हायड्रेशन शक्य होईल.”
ORSL™ बद्दल
ORSL™ (औरसल™) हे आता कंपनीच्या ORS पोर्टफोलिओचे ब्रँड नाव असून, ते W.H.O. फॉर्म्युलावर आधारित आहे आणि जुलाबामुळे होणाऱ्या डिहायड्रेशनसाठी डिझाइन करण्यात आले आहे.
Hydra-Activ Technology^सह, ORSL™ चे रेडी-टू-ड्रिंक फॉर्म्युलेशन आणि पावडर 100% सुनिश्चित W.H.O. ऑस्मोलॅरिटी^ प्रदान करतात, जे डायरियातून सावरण्यास मदत करतात. हे केअरगिव्हर्स आणि हेल्थकेअर प्रोफेशनल्ससाठी जुलाबामुळे होणाऱ्या डिहायड्रेशनवर प्रभावीपणे मात करण्यासाठी एक विश्वासार्ह, स्वच्छ आणि सोयीस्कर पर्याय आहे.
eRZL™ बद्दल
eRZL™ हे फळांच्या रसावर आधारित इलेक्ट्रोलाइट ड्रिंक असून, दैनंदिन प्रसंगी शरीरातील द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करण्यास मदत करते तसेच सौम्य ते मध्यम डिहायड्रेशनमधून सावरण्याच्या काळात सहाय्यक ठरते.
हे लेमन, अॅपल आणि ऑरेंज या तीन चविष्ट फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहे. eRZL™ च्या विस्तृत पोर्टफोलिओमध्ये eRZL™ Classics, eRZL™ Advanz Care (Immunity+), eRZL™ Plus Active+ आणि eRZL™ Rehydrate+ यांसारखे विविध प्रकार समाविष्ट आहेत.
महत्त्वाची सूचना
नवीन आणि सुधारित eRZL™ इलेक्ट्रोलाइट ड्रिंक — ज्यामध्ये पूर्वीच्या ORSL™ इलेक्ट्रोलाइट ड्रिंक पोर्टफोलिओच्या तुलनेत 87% कमी साखर आहे — देशातील बहुतांश भागांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. काही निवडक बाजारांमध्ये, जुने ORSL™ फॉर्म्युलेशन eRZL™ या नावाने मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध राहील, जोपर्यंत नवीन आणि सुधारित eRZL™ देशभरात सर्वत्र उपलब्ध होत नाही.


