Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedबीएनसीए तर्फे ‌‘मानवी बांधकाम पर्यावरणा‌’वर चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

बीएनसीए तर्फे ‌‘मानवी बांधकाम पर्यावरणा‌’वर चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

पुणे, दि.३० जानेवारी २०२६ : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन तर्फे (बीएनसीए) ‌‘मानवी बांधकाम पर्यावरण आणि त्यापलीकडील पारंपरिक ज्ञान आणि शाश्वत भविष्य‌’ (बिल्ट एनव्हायरमेंट ॲण्ड बियाँड 4.0: फ्रॉम ट्रॅडिशनल विज्डम टू रेझिलियंट फ्यूचर) या मालिकेतील चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन तीन आणि चार फेब्रूवारी 2026 रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.

 

ही परिषद बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली आहे. ते म्हणाले की, या परिषदेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील व्यावसायिक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून कल्पनांची देवाणघेवाण , ज्ञानाचे आदान प्रदान तसेच मानवी बांधकाम व त्यापलिकडील नव्या दृष्टिकांनांचा अभ्यास करण्याचा उद्देश आहे.

 

या परिषदेच्या संयोजक डॉ. संजीवनी पेंडसे, सह-संयोजक डॉ. प्राजक्ता दलाल कुलकर्णी, तर समन्वयक प्रा. सायली कुलकर्णी असून आयोजन समितीमध्ये डॉ. स्वाती सहस्रबुद्धे आणि डॉ. मीरा शिरोळकर यांचाही त्यामध्ये समावेश आहे.

 

परिषदेसंबंधी बोलताना बीएनसीएचे उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे म्हणाले की, विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ व नामवंत अभ्यासकांनी तपासलेल्या 50 संशोधन प्रबंधांची निवड या परिषदेतील सादरीकरणासाठी करण्यात आली आहे. परिषदेनंतर त्यावरील शोध निबंधांचे एकत्रित संकलन एकत्रितपणे बीएनसीए तर्फे प्रकाशित करण्यात येणार आहे. ‌‘मानवी बांधकाम व त्यापलिकडील पारंपरिक ज्ञान व शाश्वत भविष्य‌’ या विषयावरील विषयातून अभ्यासकांना सखोल आणि अमूल्य दृष्टीकोन मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले

.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments