Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedउत्कृष्ट अभियंता अमोल मोहळकर

उत्कृष्ट अभियंता अमोल मोहळकर

 

 

महामेट्रो तर्फे पुणे येथे स्वारगेट इथे भूमिगत मेट्रो स्टेशन,

पुणे राज्य बस स्थानक, पीएमपीएमएल बस स्थानक, गणेश कला क्रीडा मंच आणि इतर वाहतुकीचे मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हब निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे

आता सर्व प्रवाशांना रस्त्यावर न येता भूमिगत सबवेचा वापर करून सर्व ठिकाणी पोहोचता येईल.तसेच तिथे एक लाख स्क्वेर मीटर इतक्या आकाराचे व्यावसायिक बांधकाम उभारण्यात आले आहे.ही सर्व कामे आंतरराष्ट्रीय दर्जाची झाली आहेत.

 

ह्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल इंडियन काँक्रीट इंस्टिट्यूटतर्फे महा मेट्रो पुणे यांना “सर्वोत्कृष्ठ काँक्रीट स्ट्रक्चर” हा पुरस्कार

नुकताच पुणे येथील हॉटेल शेरटोन ग्रैंड इथे प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार

महामेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक श्री. अमोल मोहोळकर यांनी स्वीकारला. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्यावर्षी पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले होते.

 

उत्कृष्ट अभियांत्रिकी प्रकल्पांबद्दल पुरस्कार मिळण्याची श्री. अमोल मोहोळकर यांची ही काही पहिलीच वेळ नाही. या पूर्वी

त्यांना पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे या महत्वाकांक्षी प्रकल्पातील कामशेत येथील दोन्ही बाजुचे बोगदे यशस्वीपणे पुर्ण केल्याबद्दल कोकण रेल्वेचे एम्.डी. अवार्ड मिळाले होते.

गोरखपूर जवळील नेपाळ बॉर्डर वरील गंडक नदीवरील

पुलासाठी त्यांना सन २००२ साली तत्कालीन रेल्वे मंत्री तथा बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री श्री.नितीशकुमार यांच्याहस्ते पारितोषिक मिळाले होते.

 

उत्कृष्ट अभियंता म्हणुन

नाव लौकिक मिळविलेल्या

श्री मोहोळकर यांनी यापूर्वी

भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या “इरकॉन”तर्फे नॉर्थ -इस्ट रेल्वे गोरखपूर, दिल्ली, गोध्रा, मंगलोर, येथील विविध

आव्हानात्मक पुलांचे प्रकल्प तसेच मुंबईतील विविध मेट्रो, रेल्वे प्रोजेक्ट्स साठी तसेच बेंगलोर येथील इलेव्हेटेड हाय वे अशा विविध प्रकल्पांवर काम केले आहे. ते सध्या महाराष्ट्र मेट्रो रेल काॅर्पोरेशन मध्ये असून पुण्यातील विविध ठिकाणच्या मेट्रो प्रकल्पात इलेव्हेटेड आणि भूमिगत मेट्रो प्रकल्पासाठी मुख्य प्रकल्प व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत.

 

इतरांचा प्रवास सुखद आणि जलद करणार्‍या

श्री अमोल मोहोळकर यांचा

जीवन प्रवास मात्र सोपा नव्हता. त्यांच्या घरी कुठल्याही प्रकारची अभियांत्रिकी पार्श्वभूमी नव्हती. त्यांचे बालवाडी ते चौथीपर्यंतचे शिक्षण पंढरपूर येथील आदर्श प्राथमिक विद्यालयात तर चौथी ते बारावी शिक्षण विवेक वर्धिनी विद्यालयात झाले. ते बारावीत केंद्रात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले .तसेच ग्रुपला त्यांनी ९५% गुण मिळविले होते. त्यानंतर 1991 साली

त्यांनी सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मधून गुणवत्तेसह प्रथम श्रेणीत स्थापत्य अभियांत्रिकी पदवी संपादन केली. त्याच वर्षी ते कोकण रेल्वेत अभियंता म्हणून रुजू झाले. गुणवत्तापूर्ण

सेवेबद्दल त्यांना वेळोवेळी पदोन्नती मिळत गेल्या. आजवरच्या सेवेत त्यांनी वर उल्लेख केल्याप्रमाणे नेहमीच उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

 

अत्यंत कठीण परिस्थितीत वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार्‍या

अमोलजीच्या आई;श्रीमती अलका रामचंद्र मोहोळकर

या प्रथितयश लेखिका व कवयित्री आहेत. एक भाऊ वैभव हे सनदी लेखापाल आहेत तर दुसरे भाऊ वैभव हे भांड्यांचे व्यापारी आहेत.

 

अमोलजीच्या सुविद्य पत्नी सौ. वर्षा या गृहिणी आहेत. त्यांचे जेष्ठ चिरंजीव डॉ वेदांग यांनी रशियातून एमबीबीएसचे शिक्षण घेतले असून ते पुण्याच्या सिम्बायोसिस यूनिवर्सिटी हॉस्पिटल मध्ये ऑर्थोपैडिक्स विभागात कार्यरत आहे. तर कनिष्ठ चिरंजीव विराग यांनी इंग्लंड मधून एमबीए पूर्ण केले असून ते जर्मनीत कार्यरत आहेत.

 

अत्यंत व्यस्त दिनचर्या असताना देखील अमोलजीनी

त्यांची वाचन आणि गायनाची आवड जोपासली आहे हे विशेष आहे.

 

अमोलजी आणि त्यांच्या सर्व परिवारास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

लेखन: देवेंद्र भुजबळ

☎️+91 9869484800

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments