Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिंद-दी-चादर’ कार्यक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे-चरणजितसिंग साहनी*

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे-चरणजितसिंग साहनी*

 

 

पुणे, दि. १३ फेब्रुवारी: श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्यावतीने २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी खारघर, नवी मुंबई येथे भव्य ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे; या कार्यक्रमाचा सर्व समाजातील नागरिकांनी सहभागी होवून संगतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाचे राज्यस्तरीय समन्वय समिती अशासकीय सदस्य तथा कॅम्प येथील गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग साहनी यांनी केले.

 

श्री. साहनी म्हणाले, गुरु तेग बहादुर साहिब जी यांची शहीदी संपूर्ण मानवजातीच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी आणि सत्यासाठी होते. या पवित्र प्रसंगी, सिख, सिकलीगर, लबाना, बंजारा, मोहयाल, सिंधी आणि गुरुनानक नाम लेवा संगत-समुदाय एकत्रितपणे हा शहीदी समागम साजरा करीत आहेत. या सर्व समुदायांचे गुरु साहिबांशी ऐतिहासिक संबंध आहेत, ज्यांनी शतकानुशतके एकता, धैर्य आणि मानवतेचा संदेश दिला. गुरु साहिबांच्या शिकवणी आणि त्यांचे हौतात्म्यची भावना भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.

 

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त यापूर्वी नागपूर आणि नांदेड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, या कार्यक्रमास लाखो नागरिक सहभागी झाले होते. खारघर, खारघर, नवी मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात नागरिकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे.

 

श्री गुरु तेग बहादुर साहिबजीचे त्याग, शौर्य व मानवतेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी गुरुद्वारा गुरुनानक दरबारच्यावतीने आयोजित सहज पाठच्यामध्ये ३८६ नागरिकांनी सहभागी झाले होते. त्यांना प्रमाणपत्र व चांदीचे सिक्के देण्यात आले. तसेच ‘सफर-ए-शहादत’ म्हणून १७ किलोमीटर दुचाकी फेरीचे आयोजित करण्यात आले त्यामध्ये सुमारे ५०० करण्यात आली आहे, साहिबजीचे इतिहास, शहादतीबाबत नागरिकांना माहिती होण्याकरिता एक लाख पॉम्पलेटचे वितरण करण्यात आले, असेही श्री. साहनी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments