Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedकर्जबोजा थकीत ऑटोरिक्षांबाबत वित्तदात्यांनी नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आवाहन*

कर्जबोजा थकीत ऑटोरिक्षांबाबत वित्तदात्यांनी नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. 17: (जिमाका, वृत्तसेवा): नवीन अथवा जुने प्रवासी ऑटोरिक्षा वाहन खरेदी करताना वाहनमालक वित्तदात्यांकडून अर्थसहाय्य घेतात. त्यानुसार वित्तदात्यांनी जारी केलेल्या नमुना क्र. 34 प्रमाणे संबंधित वाहनांवर कर्जबोजाची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या अभिलेखावर करण्यात येते.

 

कर्जाचे हप्ते थकल्यामुळे वित्तदात्यांनी वाहन ताब्यात घेतल्यास, त्याबाबत परिवहन कार्यालयास कळवून नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही करणे बंधनकारक आहे. मोटार वाहन कायद्यानुसार अशा वाहनांच्या विक्रीसाठी आवश्यक अर्ज सादर करणे गरजेचे असून, सर्व संबंधित वित्तदात्यांनी याची नोंद घ्यावी.

 

तसेच, वाहनधारकाने थकीत रक्कम भरून वाहन ताब्यात घेणार नसल्यास, संबंधित ऑटोरिक्षावरील परवाना उतरवून बदली वाहनावर चढविणे अथवा परवाना रद्द करण्याबाबत नियमानुसार अर्ज करावा. कोणत्याही परिस्थितीत आपल्या नावे नोंद असलेल्या व परवानाधारक वाहनाचा अनधिकृत वापर रस्त्यावर होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

यासंदर्भात अडचणी असल्यास वित्तदाता अथवा ऑटोरिक्षाधारकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे (ऑटोरिक्षा विभाग) यांच्याशी संपर्क साधावा.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments