Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorized*क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या १४२ व्या पुण्यदिनानिमित्त पुण्यात आदरांजली*

*क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या १४२ व्या पुण्यदिनानिमित्त पुण्यात आदरांजली*

 

 

पुणे : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्य क्रांतिकारक आणि सशस्त्र क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे वासुदेव बळवंत फडके यांच्या १४२ व्या पुण्यदिनानिमित्त संगमवाडी ब्रीजजवळील त्यांच्या स्मारकस्थळी अभिवादन करण्यात आले.

 

फडके स्नेहवर्धिनी तर्फे आयोजित या कार्यक्रमात योगशिक्षक सुभाष बाळकृष्ण फडके, दत्तात्रय लक्ष्मण फडके, चंद्रकांत प्रभाकर फडके, चंद्रकांत दत्तात्रय फडके, दिगंबर गोपाळ फडके, सौ. सुलभा लिमये तसेच श्री व सौ. नंदकिशोर फडके यांनी उपस्थित राहून स्मारकाला पुष्पांजली अर्पण केली.

 

यावेळी उपस्थितांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्याची आठवण करून त्यांच्या त्याग व देशभक्तीला अभिवादन केले. त्यांच्या विचारांवर चालत राष्ट्रप्रेम आणि समाजसेवेची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments