पुणे, फेब्रुवारी १९, २०२६ – पॅनासोनिक लाइफ सोल्यूशन्स इंडियाने आज रोमा अर्बन स्मार्ट टच सिरीजच्या लाँचची घोषणा केली. हे नेक्स्ट-जनरेशन स्मार्ट होम आयओटी सोल्यूशन भारतातील आधुनिक कुटुंबांसाठी अधिक सोयीसुविधा, सुरक्षितता आणि कार्यक्षम जीवनशैली देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. कनेक्टेड, डिझाइन-केंद्रित स्पेसेससाठी डिझाइन करण्यात आलेल्या नवीन स्विच श्रेणीमध्ये स्मार्ट होम कंट्रोलसह प्रीमियम आकर्षकता आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीसाठी डिझाइन करण्यात आलेले रोमा अर्बन स्मार्ट टच स्विच वापरकर्त्यांना मोबाइल अॅप्लीकेशन, वॉईस कमांड्स आणि फेदर-टच फिजिकल स्विच या तीन इंटरफेसेसच्या माध्यमातून इलेक्ट्रिकल डिवाईसेसवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम करते. हे हायब्रिड कंट्रोल मॉडेल स्मार्ट कार्यक्षमता देते, तसेच मॅन्युअल वापराला कायम ठेवते.
आयओटी स्विचेसची ही श्रेणी जीवनशैली उत्साहित करण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या आणि आधुनिक आकर्षकतेला महत्त्व देणाऱ्या गृहखरेदीदारांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. ही श्रेणी तंत्रज्ञान-प्रेमी व्यावसायिक, प्रीमियम गृहमालक, आर्किटेक्ट्स आणि इंटीरिअर डिझाइनर्सच्या मागण्यांची देखील पूर्तता करते. लाइट्स, पंखे, एअर कंडिशनर्स व टेलिव्हिजन अशा विविध डिवाईसेससाठी वापरता येणारे हे स्विचेस् विनासायास स्मार्ट होम सेटअपची खात्री देतात.
या श्रेणीची खासियत म्हणजे स्विच सहजपणे बसवता येतो आणि याची रिट्रोफिट सुसंगतता होय. नवीन व जुन्या घरांसाठी अनुकूल असलेला हा स्विच घरामध्ये असलेल्या वायरिंग इन्फ्रास्ट्रक्चरसह काम करतो आणि अतिरिक्त वायरिंग किंवा स्वतंत्र गेटवे डिवाईसची गरज भासत नाही. यामुळे अपग्रेडमधील गुंतागुंती, खर्च व इन्स्टॉलेशन वेळ कमी होतो आणि स्मार्ट अपग्रेड्स अधिक सोपे व व्यावहारिक होते.
कंपनीच्या स्मार्ट प्लॅटफॉर्मचे पाठबळ आणि मिरे अॅपद्वारे ऑपरेट होणाऱ्या या तंत्रज्ञानासह वापरकर्ते सानुकूल सीन्स व ऑटोमेशन प्रोफाइल्स तयार करू शकतात, ज्यामुळे एकाच कमांडसह एकाच वेळी विविध डिवाईसेस कार्यरत होऊ शकतात. बिल्ट-इन शेड्यूलिंग वैशिष्ट्ये देखील ऊर्जा अपव्यय कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे वीजेची बचत होते. या नवीन सोल्यूशनची खासियत म्हणजे सायबरसुरक्षितता व डेटा गोपनीयतेप्रती दृढ कटिबद्धता, जेथे या दोन्ही बाबींबाबत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. रोमा अर्बन स्मार्ट टच सिरीज क्लाऊड प्लॅटफॉर्मवर डिझाइन करण्यात आली आहे, जेथे पॅनासोनिक इंडियाकडे या प्लॅटफॉर्मचे मालकीहक्क आहेत, तसेच प्लॅटफॉर्मची देखभाल व व्यवस्थापन पॅनासोनिक इंडियाद्वारे केले जाते. डिवाईसेस व क्लाऊडमधील सर्व डेटाची देवाणघेवाण सुरक्षितपणे एनस्क्रिप्ट करण्यात आलेली आहे, ज्यामुळे अनधिकृत प्रवेश किंवा डेटा चोरीचा धोका कमी होतो.
या लाँचबाबत मत व्यक्त करत पॅनासोनिक लाइफ सोल्यूशन्स इंडियाच्या पॅनासोनिक इलेक्ट्रिक वर्क्सचे मॅनेजिंग डायरेक्टर योशियुकी काटो म्हणाले, ”आजचे ग्राहक तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत, वापरण्यास सोपे आणि व्हिज्युअली आकर्षक असलेल्या स्मार्ट सोल्यूशन्सचा शोध घेतात. रोमा अर्बन स्मार्ट स्विचमध्ये स्मार्ट होम कंट्रोल, आकर्षक डिझाइन आणि विद्यमान पायाभूत सुविधेमध्ये बदल न करता वैयक्तिकृत, कनक्टेड अनुभवांसह दैनंदिन राहणीमान अपग्रेड करण्यासाठी रेट्रोफिट सोसीयुविधा आहेत.”
या सोल्यूशनचे कॉन्फिग्युरेशन युजर-अनुकूल आहे, ज्यामध्ये क्यूआर-आधारित ऑनबोर्डिंग आणि अॅपमध्ये सेटअप करण्यासंदर्भात मार्गदर्शन आहे. ही सिस्टम स्थिर कनेक्टीव्हीटीसाठी प्रमाणित २.४ गिगाहर्ट्झ वाय-फाय नेटवर्क्सवर चालते. प्रीमियम ग्लास व मेटल फिनिशेसमध्ये उपलब्ध असलेली श्रेणी स्विचबोर्ड जागेचा सानुकूलपणे वापर करते, ज्यामुळे एकाच प्लेट आकारामध्ये जवळपास ५० टक्क्यांपर्यंत नियंत्रण मिळवणे श
क्य होते.


