Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedजी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षा 2026 साठी ऑनलाईन अर्ज मुदतवाढ*

जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षा 2026 साठी ऑनलाईन अर्ज मुदतवाढ*

 

 

पुणे, दि. 20: (जिमाका, वृत्तसेवा): जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षा, 2026 साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. परीक्षेस इच्छुक उमेदवारांनी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 10 मार्च 2026 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

 

तसेच परीक्षेचे शुल्क बँकेमध्ये चलनाद्वारे भरण्याची मुदत 13 मार्च 2026 पर्यंत (बँकेच्या कामकाजाच्या वेळेत) वाढविण्यात आली आहे.

 

सदर परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व पात्र उमेदवारांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन विहित कालावधीत अर्ज व शुल्क भरणा पूर्ण करावा, असे आवाहन सचिव, जी. डी. सी. ॲण्ड ए. बोर्ड तथा उपनिबंधक (प. व प्र. ) सहकारी संस्था, पुणे यांनी केले आहे.

000000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments