Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाजी सैनिक विधवा पत्नी किंवा त्यांच्या अवलंबितासाठी चतु:श्रृंगी येथे महिला सुरक्षा...

माजी सैनिक विधवा पत्नी किंवा त्यांच्या अवलंबितासाठी चतु:श्रृंगी येथे महिला सुरक्षा रक्षक पदांची कंत्राटी भरती*

*

पुणे, दि. ७ : माजी सैनिक महामंडळातर्फे पुणे शहरातील चतु:श्रृंगी येथे माजी सैनिक विधवा पत्नी किंवा त्यांचे अवलंबिताकडून महिला सुरक्षा रक्षक पदे भरण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून इच्छुक आणि शारीरिकदृष्ट्या योग्य असलेल्या उमेदवारांनी सर्व कागदपत्रासह १५ मार्च पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक अर्हता दहावी पास व वय ३५ वर्षाखालील असावे. सुरक्षा रक्षक प्रशिक्षणाबाबतचे प्रमाणपत्र असावे. उमेदवाराची तीन शिफ्टमध्ये काम करण्यास तयारी असावी. निवड झालेल्या उमेदवाराला २५ हजार रूपये वेतन दिले जाईल. नियमानुसार वेतनातून रोजगार भविष्य निर्वाह निधी, उपदान आणि बोनससाठी ४ हजार ६०० रूपये वजा करण्यात येईल, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments