स्प्रिंग समर’ २६ या शैलीदार, काळाला धरून राहण्याचा आणि नेहमीच प्रवाहानुसार चालण्याचा गौरव करणाऱ्या कलेक्शनचे उद्घाटन
पुणे : आदित्य बिर्ला फॅशन अँड रिलेट लिमिटेड कंपनीचा, स्त्रियांच्या एथ्निक कपड्यांचा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ब्रॅण्ड ऑरेलियाने स्प्रिंग समर’ २६ कलेक्शन बाजारात आणून भारतीय कपड्यांतील नवीनतम प्रवाहासांठी ‘गो-टू’ ब्रॅण्ड हे आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. #HameshaTrending या बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा समावेश असणाऱ्या उत्साही अभियानाद्वारे हे कलेक्शन सर्वांपुढे आणले गेले आहे. ऑरेलिया हा फॅशनच्या बाबतीत सजग असणाऱ्या तरुण स्त्रियांसाठी नेहमीच पसंतीचा पर्याय राहिला आहे. आपल्या मूळ भारतीय सौंदर्याच्या कल्पना न विसरता नवीन प्रवाहांसोबत राहणे आवडणाऱ्यांना स्त्रियांमध्ये हा ब्रॅण्ड विशेष लोकप्रिय आहे. ज्या स्त्रियांना दररोज काळासोबत, आत्मविश्वासपूर्ण आणि विनासायास शैलीदार राहायला आवडते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गौरव ब्रॅण्डतर्फे या नवीन कलेक्शनद्वारे केला जात आहे.
स्प्रिंग समर ’२६ कलेक्शनद्वारे भारतीय पोशाखांतील अगदी नवीन प्रवाह पुढे आणले गेले आहेत, अद्ययावत कुर्ता सिल्हुएट आणि फ्लुइड को-ऑर्ड सेट्सपासून खेळकर बाह्या, वैशिष्ट्यपूर्ण नेकलाइन्स, अधिक सौम्य रंग आणि नवीन प्रवाहानुरूप फुलांच्या डिझाइन्सपर्यंत या ऋतूसाठी चपखल असलेले सगळे प्रकार यात आहेत. सुतासारख्या घाम टिपून घेणाऱ्या वस्त्रप्रकारांत तसेच कमी वजनाच्या मिश्र वस्त्रप्रकारांत तयार करण्यात आलेले हे कलेक्शन आरामाला आणि ऋतूला अनुसरून पोशाखाला प्राधान्य देते. सहज बसतील असे फिट्स, तलम कापड आणि मिक्स-अँड-मॅच सेपरेट्स यांमुळे दैनंदिन वापराचे कपडे, खास प्रसंगी घालण्याचे कपडे, उन्हाळी ऋतूंतील उत्सवांसाठी घालण्याचे कपडे आणि प्रवासाचे कपडे यांत वैविध्य राखले जाण्याची निश्चिती होते.
आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडच्या टीसीएनएस डिव्हिजनचे चीफ एग्झिक्युटिव ऑफिसर अनंत दागा म्हणाले, “फॅशनच्या सातत्याने उत्क्रांत होत राहणाऱ्या क्षेत्रात काळाला धरून राहण्याची इच्छा असणाऱ्या स्त्रियांना ऑरेलिया ब्रॅण्ड सातत्याने आपला वाटला आहे. या स्पष्ट स्थानावरून आम्ही भारतीय पोशाखांतील नवीनतम प्रवाहांसाठी ‘गो-टू डेस्टिनेशन’ ही ऑरेलियाची भूमिका अधिक दृढ करत आहोत. स्प्रिंग समर ’ट्वेंटीसिक्स कलेक्शन आणि #HameshaTrending अभियान ही आमची फॅशन क्षेत्रातील आघाडी भक्कम करण्याच्या दिशेने टाकलेली धोरणी पावले आहेत. त्याचबरोबर उपलब्धता, आरामदायीत्व आणि समावेशकता व्यापक प्रमाणावर देऊ करण्यासाठीही आम्ही हे कलेक्शन आणि अभियान आणले आहे. अनन्याच्या तरुण ग्राहकांशी असणाऱ्या घट्ट नात्यामुळे आमचे उद्दिष्ट अधिक व्यापक होते आणि ब्रॅण्डच्या वाढीच्या महत्त्वाकांक्षेशीही हे सुसंगत आहे.”
नऊ वैशिष्ट्यपूर्ण प्रवाह कथांमधून उलगडत जाणाऱ्या एसएस’२६ मधून ऑरेलियाची भक्कम आणि सर्वांत सुसंबद्ध डिझाइन तत्त्वे दिसून येतात. बोल्ड फ्लोरल्सचे वर्चस्व या ऋतूत कुर्ते, ड्रेसेस, कफ्तान, को-ऑर्ड सेट्स आणि थ्री-पीस ऑन्सेम्बल्स या सर्वच पोशाखांमध्ये आहे, तर औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही प्रकारांत अनुकूल ठरणारा आरामशीर व नियमित पर्याय देणाऱ्या को-ऑर्ड सेट्सचे वॉर्डरोब प्रवर्गातील महत्त्व सातत्याने वाढतच आहे. कमी वजनाच्या संमिश्र वस्त्रप्रकारांमध्ये तयार करण्यात आलेले समर डेनिम्स कुर्ते, वेस्टकोट सेट्स आणि सहज वापरण्याजोग्या समर ड्रेसेसच्या स्वरूपात आणल्यामुळे एक नवीन, आरामदायी पर्याय उपलब्ध झाला आहे.
खास उन्हाळ्याच्या दिवसांसाठी डिझाइन करण्यात आलेले वेस्टकोट सेट्स, स्पघेटी स्ट्रॅप सिल्हुएट्स आणि हॉल्टर नेकलाइन्स अशा आधुनिक पोशाखांमध्ये या कलेक्शनचे मोल अधिकच वाढले आहे. आपल्या वारशापासून प्रेरित फारशी सलवार फ्लुइड फॅब्रिक्स आणि आधुनिक प्रमाणबद्ध कपड्यांमध्ये परत आली आहे, तर कुर्ता, पलाझो, को-ऑर्ड सेट्स आणि फेस्टिव सेपरेट्स यांचे पोत, कारागिरी तसेच ते दिसायला हलके असणे यांत शिफली तपशिलांमुळे खूपच भर पडली आहे. कलेक्शनने आपल्या ‘मॉम अँड मी’ श्रेणीच्या माध्यमातून ऑरेलियाच्या राहणीमानावर आधारित डिझाइन तत्त्वांचाही विस्तार केला आहे. यामध्ये समन्वयित सिल्हुएट्स देऊ करण्यात आल्या आहेत, त्यामुळे आईला आणि मुलीला सुसंगत रंग, वस्त्रप्रकार व डिझाइनचा प्रकार यांच्याद्वारे आधुनिक शैलीत एकमेकींशी जोडून घेण्याची मुभा मिळते.
एसएस’२६ च्या माध्यमातून ऑरेलियाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे: प्रवाहाबरोबर राहण्यात भीती वाटण्याजोगे काहीच नाही- ते विनासायास, समावेशकतेने आणि आपला मूळ स्वभाव न बदलता शक्य आहे.
स्प्रिंग समर’२६ कलेक्शन आता सर्व ऑरेलिया स्टोअर्समध्ये तसेच देशभरातील ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर विक्रीसाठी
उपलब्ध आहे.


