Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी....

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी….

पिंपरी, २० फेब्रुवारी २०२६;- मराठी भाषेतून समाजजागृती, विवेकशील विचार आणि सत्यनिष्ठ पत्रकारितेची सुरूवात करणारे “दर्पणकार” बाळकृष्ण जांभेकर हे पत्रकारितेचे आद्य प्रणेते होते,अनेक भाषांवर प्रभुत्व असलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठी वृत्तपत्र प्रकाशीत करून मराठी वृत्तपत्राचा नवा अध्याय सुरू केला असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस महापौर रवि लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते.

 

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव,उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रिय अधिकारी अतुल पाटील, अजिंक्य येळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते

.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments