Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedएका मोबिलिटी, सीआरयूटी, ट्रॅव्‍हल टाइम आणि जीआयझेड यांनी कुशल महिला ई-बस ड्रायव्‍हर्सना...

एका मोबिलिटी, सीआरयूटी, ट्रॅव्‍हल टाइम आणि जीआयझेड यांनी कुशल महिला ई-बस ड्रायव्‍हर्सना प्रशिक्षण देण्‍यासाठी सहयोग केला

पुणे,23 फेब्रुवारी 2026: एका मोबिलिटी या भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या व्‍यावसायिक इलेक्ट्रिक वेईकल (ईव्‍ही) व तंत्रज्ञान कंपनीने कॅपिटल रिजियन अर्बन ट्रान्‍सपोर्ट (सीआरयूटी)मधील २० महिला ड्रायव्‍हर्ससाठी दोन आठवड्यांचा ई-बस ड्रायव्‍हर स्किल डेव्‍हलपमेंट प्रोग्राम यशस्‍वीरित्‍या पूर्ण केला आहे.

 

डॉईश जेसेलशाफ्ट फर इंटरनॅशनल झुसामेनारबीट (जीआयझेड)ने आपल्‍या सीएसआर आराखड्याच्‍या माध्‍यमातून या उपक्रमाला पाठिंबा दिला, तसेच ट्रॅव्‍हल टाइमकडून पुण्‍यातील चाकण येथे एका मोबिलिटीच्‍या उत्‍पादन प्‍लांटमध्‍ये हा उपक्रम राबवण्‍यात आला.

 

हा प्रकल्‍प सीआरयूटीचा आपल्‍या ऑपरेशनल ताफ्यामध्‍ये महिला कर्मचाऱ्यांची संख्‍या वाढवण्‍याप्रती मोठ्या प्रयत्‍नाचा भाग आहे, तसेच राज्‍याच्‍या इलेक्ट्रिक सार्वजनिक परिवहनाप्रती परिवर्तनाला देखील पाठिंबा देतो. इलेक्ट्रिक बसेससाठी विशेष टेक्निकल ज्ञान आणि ऑपरेशनल हाताळणीची गरज आहे, ज्‍यामुळे सहभागींना प्रत्‍यक्ष ड्रायव्हिंग अनुभव, ईव्‍ही यंत्रणांबाबत टेक्निकल माहिती आणि दैनंदिन प्रवाशांच्‍या वाहतूकीसाठी आवश्‍यक असलेले व्‍यावसायिक कौशल्‍य देण्‍यासाठी हा संरचित प्रशिक्षण उपक्रम डिझाइन करण्‍यात आला.

 

संरचित माहितीपूर्ण अनुभव म्‍हणून डिझाइन करण्‍यात आलेल्‍या दोन आठवड्यांचा उपक्रमामध्‍ये एका ई-बसेसबाबत व्‍यावहारिक ड्रायव्हिंग सत्रे, कंपनीच्‍या इंजीनिअर्सच्‍या नेतृत्‍वांतर्गत टेक्निकल मॉड्यूल्‍स आणि सर्वोत्तम फॅक्‍टरी अनुभव यांचा समावेश होता. सहभागींना रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग, अवजड वाहने ड्राइव्‍ह करण्‍याचे कौशल्‍य, ईव्‍ही नियंत्रण यंत्रणा, ई-बस सुरू व बंद करण्‍याची प्रक्रिया आणि प्रत्‍यक्ष रस्‍त्‍यावर ड्रायव्हिंग सिम्‍युलेशन्‍स यांचे प्रशिक्षण देण्‍यात आले. या प्रशिक्षणामध्‍ये बॅटरी यंत्रणा, ऊर्जा व्‍यवस्‍थापन, चार्जिंग प्रोटोकॉल्‍स, हाय-व्‍होल्‍टेज सुरक्षा पद्धती आणि सुरक्षित व कार्यक्षम कार्यसंचालनांच्‍या खात्रीसाठी आवश्‍यक असलेल्‍या दैनंदिन तपासणी याबाबत देखील माहिती देण्‍यात आली.

 

संपूर्ण प्रशिक्षणामध्‍ये सुरक्षिततेला अधिक महत्त्व देण्‍यात आले. सत्रांमध्‍ये बचावात्‍मक ड्रायव्हिंग तंत्रे, रस्‍ते सुरक्षा नियम, प्रवाशांच्‍या सुरक्षिततेचे व्‍यवस्‍थापन आणि आपत्‍कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्‍याची प्रक्रिया यांचा समावेश होता. संवाद, ग्राहक सेवा, आत्‍मविश्वास निर्मिती आणि व्‍यावसायिक आचरण यावरील सॉफ्ट स्किल्‍स मॉड्यूल्‍सने सहभागींना प्रत्‍यक्ष प्रवाशांची संपर्क येणाऱ्या भूमिकांसाठी सुसज्‍ज केले.

 

 

 

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त एका मोबिलिटीच्‍या ग्रुप प्रेसिडण्‍ट रितिका मेहता म्‍हणाल्‍या, ”एका मोबिलिटीमध्‍ये आमचा विश्वास आहे की, गतीशीलतेचे भविष्‍य शाश्वत व सर्वसमावेशक असले पाहिजे. हा उपक्रम टेक्निकल प्रशिक्षणाच्‍या पलीकडे जात रोजगार संधी निर्माण करतो, ड्रायव्हिंगबाबत आत्‍मविश्वास देतो आणि महिलांना सार्वजनिक परिवहनाच्‍या भावी पिढीचे नेतृत्‍व करण्‍यास सुसज्‍ज करतो. आम्‍हाला सीआरयूटीच्‍या ध्‍येयाला पाठिंबा देण्‍याचा, तसेच ओडिशाला शुद्ध व समान गतीशीलतेप्रती परिवर्तनामध्‍ये मदत करण्‍याचा आनंद होत आहे.”

 

एका मोबिलिटीच्‍या असेम्‍ब्‍ली लाइन्‍स, दर्जात्‍मक चाचणी सुविधा आणि चार्जिंग पायाभूत सुविधेच्‍या मार्गदर्शन दौऱ्यादरम्‍यान सहभागींना इलेक्ट्रिक बसेसचे उत्‍पादन व देखभाल करण्‍याच्‍या पद्धतींबाबत प्रत्‍यक्ष माहिती मिळाली. ज्‍यामुळे सहभागींच्‍या टेक्निकल ज्ञानामध्‍ये अधिक भर झाली आणि ते भविष्‍यात ऑपरेट करणाऱ्या वेईकल्‍सबाबत अधिक माहिती मिळाली. सर्व २० सहभागींनी यशस्‍वीरित्‍या हा उपक्रम पूर्ण केला, ज्‍यामधून सीआरयूटीच्‍या इलेक्ट्रिक बस ताफ्यामध्‍ये सामील होण्‍यासाठी त्‍यांची उत्तम ऑपरेशनल सुसज्‍जता व आत्‍मविश्वास दिसून आला.

 

 

 

ट्रॅव्‍हल टाइमचे संचालक श्री. विवेक काळकर म्‍हणाले, ”सहभागींना इलेक्ट्रिक बसेस् ऑपरेट करण्‍यासाठी पूर्णपणे प्रशिक्षण देण्‍यासह सार्वजनिक परिवहन ड्रायव्हिंगच्‍या जबाबदाऱ्यांसाठी पूर्णपणे सुसज्‍ज करण्‍यासाठी हा उपक्रम काळजीपूर्वक डिझाइन करण्‍यात आला होता. प्रत्‍यक्ष रस्‍त्‍यावर ड्रायव्हिंग सराव, सेफ्टी ड्रिल्‍स, विविध स्थितींवर आधारित माहितीच्‍या माध्‍यमातून आम्‍ही शिस्‍तबद्ध ड्रायव्हिंग, संभाव्‍य धोक्‍यांबाबत माहिती आणि प्रवासी-केंद्रित विचारसरणी यावर लक्ष केंद्रित केले. परिणामत:, महिला ड्रायव्‍हर्सचा समूह पूर्णपणे कार्यक्षम असून पहिल्‍या दिवसापासून शहरामध्‍ये सुरक्षित, अधिक विश्वासार्ह बस सेवा देण्‍यासाठी सक्षम बनला आहे.”

 

हा उपक्रम महिला ईव्‍ही ड्रायव्‍हर्सचा समूह विकसित करतो, तसेच ओडिशाच्‍या परिवहन उद्योगामध्‍ये आर्थिक सक्षमीकरण आणि लैंगिक विविधतेला चालना देखील देतो.

 

 

 

शुद्ध गतीशीलता ध्‍येयांसह लैंगिक सर्वसमावेशकतेला एकत्र करण्‍यासाठी हा उपक्रम उद्योग आणि सार्वजनिक परिवहन प्राधिकरण यांच्‍यामध्‍ये सहयोग वाढवण्‍यावर भर देतो. हा उपक्रम भारतातील ईव्‍ही कर्मचारीवर्गाला अधिक निपुण करण्‍यासाठी अनुकरणीय मॉडेल तयार करतो, तसेच टेक्निकल कौशल्‍ये व शाश्वत परिवहन ध्‍येयांना एकत्र करत महिलांकरिता गतीशीलता उद्योगामध्‍ये नवीन करिअर मार्ग निर्माण करतो.

 

==============================

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments