Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedकॅम्पसमधूनच राजकारणाची नवी पिढी निर्माण होईल  खासदार अनुराग सिंह ठाकूर यांचे...

कॅम्पसमधूनच राजकारणाची नवी पिढी निर्माण होईल  खासदार अनुराग सिंह ठाकूर यांचे मत : १५ व्या भारतीय छात्र संसदेचा समारोप.

 

पुणे, २३ फेब्रुवारी: धोरणनिर्मिती, प्रशासन आणि सार्वजनिक सेवेतील गुंतागुत समजून तरुणांनी राजकीयदृष्ट्या कुशल, प्रशासन जाणकार आणि सामाजिक दृष्ट्या संवेदनशील बनविण्यासाठी कॅम्पसमधूनच एक नवी पिढी निर्माण होऊ शकते. राजकारणाला शुद्ध करण्यासाठी नवीन आणि सक्षम प्रतिभावान युवकांनी राजकारणात प्रवेश करावा. असे आवाहन लोकसभा खासदार व माजी केंद्रीय मंंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांच्या वतिने आयोजित करण्यात आलेल्या १५ व्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार शाहिद सिद्दीकी आणि राज्यसभा खासदार डॉ. संदीप कुमार पाठक हे सन्मानीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष आणि छात्र संसदेचे संस्थापक डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस आणि सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५व्या भारतीय छात्र संसदेला पाठविलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचन करण्यात आले.

अनुरागसिंह ठाकूर म्हणाले, लोकशाही, नेतृत्व आणि सार्वजनिक धोरण याबरोबरच केवळ एआय नैतिकतेची उपेक्षा करु शकत नाही. २१ व्या शतकात कॅम्पस मधून कॅबिनेटमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर एआय नैतिकतेशी जुळवून घेतले पाहिजे.  मानवीय दृष्टीकोनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञानाची शक्ती म्हणजे एआयची शक्ती यावर शिखर परिषदेचे आयोजन केले होते.

गेल्या १० वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडला आहे. यामध्ये आयआयटी, आयएमएम, कॉलेज, युनिव्हर्सिटी यांच्या संख्येत वृद्धि झाली आहे. आत्मनिर्भर भारतासाठी सेमीकंडक्टर, हेल्थकेअर व अन्य क्षेत्रातील अतुलनीय वृद्धी होत आहे. विरोधकांना राजकारण करावयाचे असेल तर तर्क आणि तथ्यांच्या आधारे राजकारण करावे.

शाहिद सिद्दीकी म्हणाले, विश्वगुरू बनण्यासाठी युवकांनी स्वतःला सशक्त बनवा. तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून राहू नये. युवकांनी केलेल्या आंदोलनामुळेच या देशात परिवर्तनाची लाट आली आहे. त्यात जेपी मुव्हमेंट सारख्या अनेक चळवळीचा सहभाग आहे. युवकांनी जाती-पातीच्या भिंती तोडून देश विकासासाठी कार्य करावे. देशाला बदलायचे असेल तर सर्वात प्रथम युवकांनी मानसिकता बदलावी. लोकशाही म्हणजे देशातील सर्व नागरिकांना एक सारखा न्याय, कायदे आणि एकसारखी वागणूक आहे.

डॉ. संदीपकुमार पाठक म्हणाले, कॅम्पस टू कॅबिनेट बद्दल अनेक गैरसमज आहेत. विद्यापीठांमध्ये निवडणूका होणे गरजेचे असून येथील होणार्‍या डिबेटच्या माध्यमातून उत्कृष्ट नेते तयार होतील. मूल्याधिष्ठित राजकारण गरजेचे असून देशाचे भविष्य निश्चित आहे. त्यातूनच विकास होईल. देशातील सर्व शिक्षण संस्थेच्या तत्परतेच्या माध्यमातूनच देशाचे भविष्य घडू शकते.

डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, करप्शन, कास्टीझम, कम्युनलायझेशन आणि कलोनियल माइंड सेट बदलणे गरजेचे आहे. भारतीय छात्र संसद ही लोकशाहीमध्ये नेतृत्वाची संधी प्रदान करणारा एक उपक्रम आहे. राजकारणाचे प्रशिक्षण देणारी ही पहिली शैक्षणिक संस्था आहे. आमचा प्रयत्न चांगल्या आणि सुशिक्षित तरुणांना राजकारणात आणण्याचा आहे.

विद्यार्थी दिपक कुमार पांडे, पूर्वी गंजीवाले, प्रताप पुंडे, उदय शर्मा, नेहाली चावडीकर यांनी आपले मांडले.

कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागत पर भाषण केले.

प्रा.डॉ.  गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments