मुंबई, 27 फेब्रुवारी 2026: बेरालिया रोडलाइन्स प्रा. लि. (जेट रोडवेज) यांनी आज अल्ट्रा गॅस अँड एनर्जी लिमिटेड (UGEL) सोबत दीर्घकालीन LNG पुरवठा करार केल्याची घोषणा केली, ब्लू एनर्जी मोटर्सकडून घेतलेल्या LNG वर चालणाऱ्या उच्च-स्तरीय ट्रकचा ताफा वाढवत असताना कंपनीने हा महत्त्वाचा करार केला आहे.
नागपूरमध्ये झालेल्या या करारामुळे UGEL च्या रिटेल नेटवर्कमार्फत कंपनीच्या लाँग-हॉल ऑपरेशन्ससाठी LNG चा नियमित पुरवठा सुनिश्चित झाला आहे. भारताच्या फ्रेट सेक्टरमध्ये LNG चा वापर वाढत असल्याने, फ्लीटचे नियोजन, गाड्यांची सततची उपलब्धता आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंधनाची सातत्याने उपलब्धता आता अत्यंत गरजेची बनली आहे.
बेरालिया रोडलाइन्स आपल्या फ्लीटमध्ये ब्लू एनर्जी मोटर्सच्या LNG उच्च-स्तरीय ट्रक्सची सातत्याने भर घालत आहे. लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी LNG हा व्यवहार्य आणि परिणामकारक पर्याय ठरत असल्याचा वाढता विश्वास यामागे दिसून येतो. आता इंधनाचा निश्चित आणि नियमित पुरवठा उपलब्ध झाल्यामुळे, कंपनीला महत्त्वाच्या फ्रेट कॉरिडॉर्सवर विश्वासार्ह सेवा कायम ठेवत आपल्या ऑपरेशन्सचा विस्तार करण्यासाठी अधिक बळ मिळणार आहे.
बेरालिया रोडलाइन्स प्रा. लि./जेट रोडवेजचे संचालक आणि भागीदार अर्चित अग्रवाल म्हणाले:
“ब्लू एनर्जी मोटर्सच्या LNG उच्च-स्तरीय ट्रक्ससह विस्तार करण्याचा आमचा निर्णय लाँग-हॉल मार्गांवर मिळत असलेल्या मजबूत कार्यात्मक परिणामांवर आधारित आहे. कार्यक्षमता, इंधन कार्यक्षमता आणि अपटाइम हे आमच्या व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, आणि LNGचा खात्रीशीर पुरवठा हा वेग कायम ठेवण्यासाठी मोठी भूमिका बजावतो. हा करार झाल्यामुळे आता आम्ही आमचे LNG फ्लीट अधिक स्थिर आणि व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर पद्धतीने वाढवण्यासाठी अधिक सक्षम झालो आहोत.”
अल्ट्रा गॅस अँड एनर्जी लिमीटेडचे मकसूद शेखचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO म्हणाले की:
“ब्लू एनर्जी मोटर्सच्या LNG वर चालणाऱ्या ट्रक्सची तैनाती सातत्याने वाढत असताना, इंधनाचा खात्रीशीर पुरवठा करणारे फ्लीट ऑपरेटर्ससाठी अधिकाधिक महत्त्वाचा ठरत आहे. आमचे हे सहकार्य रोजच्या ऑपरेशन्सला आधार देणारा विश्वासार्ह LNG पुरवठा सुनिश्चित करते आणि त्याचबरोबर स्वच्छ फ्रेट सोल्यूशन्सकडे होणाऱ्या मोठ्या बदलालाही गती देते.”
ब्लू एनर्जी मोटर्स आणि न्यु एनर्जी बिजनेसचे CEO – EV आनंद मिमानी म्हणाले:
“पर्यायी इंधनावर चालणारे ट्रक खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात वाढवायचे असतील, तर वाहन तंत्रज्ञानासोबतच त्याला पूरक असलेली संपूर्ण व्यवस्था ही तितक्याच वेगाने विकसित होणे गरजेचे आहे. हा करार म्हणजे आमच्या ग्राहकांना खात्रीशील इंधन उपलब्धता देण्याच्या दिशेने टाकलेले एक व्यावहारिक पाऊल आहे, ज्यामुळे ते लाँग-हॉल मार्गांवर अधिक आत्मविश्वासाने कार्य करू शकतील.”
ब्लू एनर्जी मोटर्स पर्यायी इंधनाच्या उच्च-स्तरीय क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष रस्त्यावर मोजता येण्याजोगी कामगिरी सातत्याने दाखवत आहे. कंपनीच्या LNG आणि इलेक्ट्रिक ट्रक ताफ्याने मिळून आतापर्यंत 90 दशलक्ष किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पूर्ण केले आहे आणि त्यामुळे 25,000 टनपेक्षा अधिक CO₂ उत्सर्जनात घट झाली आहे. पर्यायी इंधनाच्या उच्च-स्तरीय वाहन क्षेत्रामध्ये कंपनीने क्रमांक 1 चे स्थान कायम राखले आहे, जे उद्योगातील सातत्यपूर्ण विश्वास आणि मजबूत कार्याच्या अंमलबजावणीचे प्रतिबिंब आहे.
नागपूरमध्ये झालेला हा करार भारतात स्वच्छ लाँग-हॉल फ्रेट वाहतुकीसाठी LNG हा अधिकाधिक स्वीकारला जाणारा आणि स्थिर पर्याय बनत असल्याचे स्पष्ट दाखवतो. फ्लीट ऑपरेटर्स, उत्पादक आणि फ्युएल प्रोव्हायडर्स यांच्यात वाढत चाललेली समन्वयाची भा
वना या
बेरालिया रोडलाइन्स प्रा. लि. ने आपल्या ब्लू एनर्जी मोटर्सच्या LNG फ्लीटसाठी अल्ट्रा गॅस अँड एनर्जी लिमिटेडसोबत दीर्घकालीन LNG केला पुरवठा करार
RELATED ARTICLES


