पुणे, 27 फेब्रुवारी 2026: कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेडची इलेक्ट्रिक मोबिलिटी शाखा असलेल्या कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्स लिमिटेड (KWV) ने पुण्यात सिंहगड रोड येथे आपल्या पाचव्या डीलरशिपचा शुभारंभ नुकताच केला. आयुष मोटर्स ईव्ही यांच्या अंतर्गत हे दालन सुरू करण्यात आले आहे. या नव्या विस्तारीकरणामुळे ग्राहकांना अधिक फायदा होणार आहे.
सिंहगड रोड येथील कुडाळे पाटील टाँवर येथे हे दालन खुले करण्यात आले आहे. यात ही ३एस (सेल्स, सर्व्हिस आणि स्पेअर्स) सुविधा कायनेटिक DX इलेक्ट्रिक स्कूटरसाठी संपूर्ण ग्राहक सहाय्य मिळणार आहे.
या उद्घाटनानंतर KWV आता पुण्यात सिंहगड रोडसह डापोडी, विश्रांतवाडी, कोथरूड आणि हडपसर येथे एकूण पाच डीलरशिप चालवत आहे. नव्या दालनाच्या निमित्ताने कंपनीने खास गुढीपाडव्याच्या निमित्ताने विशेश सवलतही जाहीर केली आहे. यानुसार, ₹८,९९९ किमतीची १,००,००० किमी बॅटरी वॉरंटी, ५.९९% पासून आकर्षक फायनान्स दर, तसेच एक्स्चेंज ऑफर्स यांचा समावेश आहे.
उद्घाटनप्रसंगी अजिंक्य फिरोदिया, व्हाइस चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्स, म्हणाले, “पुणे आमच्यासाठी फक्त एक बाजारपेठ नाही — ते आमचे घर आहे. कायनेटिकचा प्रवास इथूनच सुरू झाला आणि येथे विस्तार करताना आम्हाला अभिमानासोबत जबाबदारीची जाणीवही आहे. शहरातील पाचव्या डीलरशिपच्या उद्घाटनामुळे आम्ही ग्राहकांना कायनेटिकच्या अभियांत्रिकी वारशावर आधारित विश्वासार्ह इलेक्ट्रिक मोबिलिटी अधिक सुलभ करत आहोत. कायनेटिक DX ईव्हीमध्ये परंपरेची आठवण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम संगम आहे, आणि आमच्या वाढत्या रिटेल नेटवर्कद्वारे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह मालकीचा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
कुनाल डेडगे, डीलर प्रिन्सिपल, आयुष मोटर्स ईव्ही, म्हणाले, “कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्ससोबत भागीदारी करताना आम्हाला अभिमान वाटतो आणि सिंहगड रोड परिसरातील ग्राहकांपर्यंत कायनेटिकचा प्रतिष्ठित ब्रँड पोहोचवण्याची संधी मिळत आहे. कायनेटिकवरील विश्वास, तसेच DX ईव्हीची उपयुक्तता आणि विश्वासार्हता यामुळे हे वाहन कुटुंबांसाठी आणि रोजच्या प्रवाशांसाठी उत्कृष्ट पर्याय ठरते. उत्कृष्ट सेवा, पारदर्शकता आणि दीर्घकालीन सहाय्य यांच्या आधारावर मजबूत ग्राहक समुदाय उभारणे हे आमचे ध्येय आहे.”
कायनेटिक DX+ आणि DX हे दोन्ही मॉडेल्स Range-X LFP बॅटरीने सुसज्ज असून, भारतातील NMC बॅटरी असलेल्या स्कूटर्सच्या तुलनेत सुमारे ४ पट अधिक आयुष्य देतात, ज्यामुळे अधिक सुरक्षितता आणि उष्णतेतील स्थिरता मिळते.
दोन्ही मॉडेल्समध्ये रिव्हर्स आणि हिल-होल्ड फीचर्स उपलब्ध आहेत. आरामासाठी टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन आणि अॅडजस्टेबल रिअर शॉक अब्झॉर्बर्स, तर सुरक्षिततेसाठी २२० मिमी फ्रंट डिस्क आणि १३० मिमी रिअर ड्रम ब्रेक (कॉम्बी ब्रेकिंग) देण्यात आले आहेत.
DX ईव्ही रेंजसाठी स्वतंत्र मोबाइल अॅप उपलब्ध आहे, तर DX+ मध्ये प्रगत टेलीकायनेटिक फीचर्स, रिअल-टाइम राईड डेटा, जिओ-फेन्सिंग, इंट्रूडर अलर्ट, फाइंड माय कायनेटिक, ट्रॅक माय कायनेटिक इत्यादी सुविधा मिळतात.
स्कूटरला My Kiney Companion Voice Alerts या वैशिष्ट्यामुळे व्यक्तिमत्त्व दिले गेले आहे, ज्यामध्ये स्कूटर वापरकर्त्याला शुभेच्छा देते, सुरक्षिततेसंबंधी सूचना देते आणि वाढदिवसाच्या शुभेच्छाही देते. दोन्ही व्हेरिएंटमध्ये Kinetic Assist स्विच असून Bluetooth द्वारे त्वरित CRM संपर्क साधता येतो. याशिवाय इनबिल्ट स्पीकरद्वारे म्युझिक आणि व्हॉइस नेव्हिगेशनची सुविधा उपलब्ध आहे.
ग्राहक www.kineticev.in या संकेतस्थळावर ₹१००० मध्ये बुकिंग करू शकतात.
कायनेटिक DX ची किंमत ₹१,११,४९९ आणि DX+ ची किंमत ₹१,१७,४९९ (एक्स-शोरूम) आहे.
DX+ पाच रंगांमध्ये — लाल, निळा, पांढरा, सिल्वर आणि काळा उपलब्ध आहे, तर DX सि
ल्वर आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे.


