मुंबई, ३ मार्च, २०२६ :- नुवामा आणि कुशमन अँड वेकफिल्ड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (एनसीडब्लू) द्वारे व्यवस्थापित व्यावसायिक रिअल इस्टेट-केंद्रित फंड, प्राईम ऑफिसेस फंड (प्राईम) ने पुण्यातील खराडी येथील ग्रेड ए प्लस श्रेणी असलेली व्यावसायिक ऑफिस मालमत्ता टेनस्टेप्सचे अधिग्रहण केल्याची घोषणा केली आहे.या अधिग्रहण व्यवहारासह प्राइमने तिसऱ्या शहरातील कार्यालयीन बाजारपेठेत प्रवेश केला आहे.या व्यवहारामुळे भारतातील प्रमुख कार्यालयीन बाजारपेठांमध्ये वैविध्यपूर्ण व संस्थात्मक दर्जाचा कार्यालयीन मालमत्ता पोर्टफोलिओ उभारण्याच्या प्राईमच्या धोरणाला अधिक बळकटी मिळाली आहे.
टेनस्टेप्स हा प्रकल्प सुमारे १.१ दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळावर उभा आहे. शिवाय, हा कार्यालयीन प्रकल्प आयजीबीसी लीड प्लॅटिनम प्री-सर्टिफाइड आहे. टेनस्टेप्सचे अधिग्रहण हे संयुक्त उपक्रम रचनेद्वारे केले गेले आहे. याअंतर्गत टेनस्टेप्सच्या अधिग्रहणात प्राईमचा ५१ टक्के हिस्सा असून उर्वरित हिस्सा केपेलचा आहे. या व्यवहारानंतर प्राईमचा पोर्टफोलिओ दिल्ली एनसीआर, चेन्नई आणि पुणे येथे सुमारे ३.८ दशलक्ष चौरस फूट इतका झाला आहे.
या अधिग्रहणासह पुण्यातील फंडाचा हा संतुलित विस्तार ऑक्युपायरची वाढती मागणी, मजबूत टॅलेंट इकोसिस्टम तसेच संस्थांकडून दीर्घकालीन मागणी असलेल्या बाजारपेठांमधील प्राईमच्या विकासाबाबतचा दृढनिश्चय दर्शवितो.तंत्रज्ञान तसेच ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (जीसीसी) केंद्र म्हणून पुण्याचे स्थापित असे स्थान आहे. पुण्यासारख्या प्रमुख कार्यालयीन बाजारपेठांमध्ये उच्च दर्जाच्या मालमत्ता संपादन करणे हे प्राईमच्या ध्येयाशी सुसंगत असे आहे.
एनसीडब्ल्यूचे मुख्य गुंतवणूक अधिकारी गौरव पुरी म्हणाले, या अधिग्रहणाद्वारे प्रख्यात व वेगाने वाढत असलेल्या बाजारपेठांमध्ये शिस्तबद्ध भांडवलाची गुंतवणूक करत तसेच मालमत्तेच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करून आम्ही आमच्या गुंतवणूक तत्त्वांना बळकटी देत आहोत. आमच्या निधीचा वापर करत असताना आमचे प्राधान्य प्रमुख कार्यालयीन बाजारपेठांमध्ये ग्रेड ए-प्लस मालमत्तेचा पोर्टफोलिओ उभारणे हे आहे, जे आमच्या गुंतवणूकदारांसाठी मागणी आणि मूल्यनिर्मितीबाबत दीर्घकालीन निश्चितता प्रदान करतात आणि या चौकटीत पुणे अगदी योग्य बसते.
‘टेनस्टेप्स’ हा समकालीन तसेच संस्थात्मक दर्जाचा कार्यालयीन विकास प्रकल्प आहे. शिवाय ‘टेनस्टेप्स’ हा पुण्यातील सुस्थापित कार्यालयीन परिसरात स्थित आहे. या प्रकल्पात शाश्वतता प्रमाणपत्रे तसेच कार्यक्षम रचना यांचा समन्वय साधण्यात आला आहे.जोडीला, ‘टेनस्टेप्स’ला प्लॅटिनम प्रमाणपत्र प्राप्त झाले असून रचना-आधारित कार्यक्षमतेमुळे, विशेषतः तंत्रज्ञान-आधारित तसेच जागतिक उद्योग क्षेत्रांमध्ये कार्यकारी कामगिरी, कार्यस्थळाची गुणवत्ता तसेच दीर्घकालीन प्रासंगिकता यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कार्यालयीन वापरकर्त्यांसाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरतो.
या अधिग्रहणासह प्राईमने निवडक तसेच मालमत्ता-आधारित दृष्टिकोनातून आपल्या पोर्टफोलिओच्या विस्ताराची प्रक्रिया ही पुढेच सुरू ठेवली आहे. यामुळे प्राईमच्या भारतातील प्रमुख कार्यालयीन क्षेत्रांमध्ये उच्च दर्जाच्या कार्यालयीन विकास प्रकल्पाची भर पडली आहे.
नुवामा अँड कुशमन अँड वेकफील्ड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (एनसीडब्लू) बद्दल :-
नुवामा अँड कुशमन अँड वेकफील्ड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (एनसीडब्लू) ही नुवामा अॅसेट मॅनेजमेंट, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडची पर्यायी-केंद्रित शाखा आणि जागतिक रिअल इस्टेट सेवा फर्म कुशमन अँड वेकफील्ड (NYSE: CWK) यांच्यातील ५०:५० भागीदारी असणारा संयुक्त उपक्रम आहे.एनसीडब्ल्यू व्यावसायिक स्थावर मालमत्तेमध्ये देशांतर्गत गुंतवणूकदारांना सर्वसमावेशक क्षमतेसह गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देण्याचे तसेच उच्च दर्जाच्या स्थावर मालमत्ता गुंतवणुक संधींमध्ये सहभागी होण्याची संधी प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवते. एनसीडब्ल्यूचा प्रमुख निधी प्राईम ऑफिसेस फंड (प्राईम) २०२५ मध्ये प्रथम क्लोज झाला. या निधीचे लक्ष्य हे भारतातील प्रमुख व उच्च-वाढीच्या बाजारपेठांमध्ये प्राईम कमर्शियल ऑफिस मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचे आहे.


