Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी ६ मार्चपर्यंत मुदतवाढ*

शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी ६ मार्चपर्यंत मुदतवाढ*

 

 

पुणे, दि. ५: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.७ वी) २६ एप्रिल, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेकरिता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता नियमित शुल्कासह ६ मार्च, २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत असल्याचे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे यांनी कळविले आहे.

 

या परीक्षेकरिता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र / शुल्क भरणा करण्याकरीता वाढीव मुदत मिळण्यासाठी परीक्षा परिषदेस अनेक शाळांकडून विनंती प्राप्त झाली आहे. या अनुषंगाने अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. विलंब शुल्कासह ८ मार्च आणि अतिविलंब शुल्कासह १० मार्च पर्यंत ही मुदत असेल.

 

सदर परीक्षेकरिता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दिलेल्या मुदतीत सदर प्रक्रिया पूर्ण करावी. १० मार्च २०२६ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाहीत याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments