Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedजागतिक पातळीवर सॅमसंग गॅलेक्सी एस २६ अव्वल

जागतिक पातळीवर सॅमसंग गॅलेक्सी एस २६ अव्वल

बार्सिलोना, स्‍पेन – मार्च ६, २०२६ – सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स कं. लि.ने आज घोषणा केली की, गॅलेक्‍सी एस२६ अल्‍ट्राला स्‍पेनमधील बार्सिलोनामध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या मोबाइल वर्ल्‍ड काँग्रेस (एमडब्‍ल्‍यूसी)दरम्‍यान ग्‍लोबल मोबाइल अवॉर्ड्स (ग्‍लोमो अवॉर्डस)मध्‍ये ‘बेस्‍ट इन शो’ पुरस्‍कारसह सन्‍मानित करण्‍यात आले. ग्‍लोबल मोबाइल कम्‍युनिकेशन्‍स असोसिएशन (जीएसएमए) दरवर्षी एमडब्‍ल्‍यूसीदरम्‍यान ग्‍लोमो अवॉर्ड्सचे आयोजन करते, जेथे मोबाइल उद्योगामधील उल्‍लेखनीय नाविन्‍यतांना प्रशंसित केले जाते. ‘बेस्‍ट इन शो’ श्रेणी ग्राहक-केंद्रित उत्‍पादनांना प्रशंसित करते, जे तंत्रज्ञानासाठी मापदंड स्‍थापित करतात. उद्योगामधील सर्वोच्‍च सन्‍मान ‘बेस्‍ट इन शो’ मिळणारे डिवाईसेस डिजिटल क्षेत्रात ‘सुवर्ण मानक’ (गोल्‍ड स्‍टॅण्‍डर्ड) म्‍हणून ओळखले जातात, ज्‍यांचे जगातील २०० हून अधिक आघाडीचे स्‍वतंत्र विश्‍लेषक, पत्रकार आणि उद्योगामधील दिग्‍गजांकडून परीक्षण केले जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments