Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedराज्यातील औद्योगिक प्रशिक्षण परिसंस्था अधिक होणार भक्कम राज्य सरकार आणि टीएकेएममध्ये...

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण परिसंस्था अधिक होणार भक्कम राज्य सरकार आणि टीएकेएममध्ये सामंजस्य करार

पुणे, ६ मार्च 2026: राज्यातील कौशल्य विकास परिसंस्था भक्कम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकार आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्स यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला. त्याअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय आयटीआय देवगिरी येथील अद्ययावत प्रयोग शाळेचे उद्घाटन करण्यात आले.

 

याशिवाय, टीकेएमने मराठवाडा आणि नागपूर विभागातील 16 शासकीय आयटीआयंचेही आधुनिकीकरण केले आहे. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण युवकांना जागतिक दर्जाचे तांत्रिक कौशल्य प्रदान करून त्यांना सक्षम तंत्रज्ञ बनवणे आणि भारताच्या औद्योगिक प्रगतीत त्यांचा अर्थपूर्ण सहभाग घडवणे हा आहे.

 

महाराष्ट्रातील नवीन आराखडा हा प्रामुख्याने प्राध्यापक विकास, प्रयोगशाळा व कार्यशाळा उन्नतीकरण आणि संस्कृती परिवर्तन या त्रिसूत्रींवर आधारित आहे. या भागीदारीअंतर्गत, छत्रपती संभाजीनगरमधील गव्हर्नमेंट आयटीआय देवगिरी हे संपूर्ण राज्यात संरचित आणि विस्तारक्षम कौशल्य विकास आराखडा लागू करण्यासाठी एक डेमोन्स्ट्रेशन मॉडेल म्हणून विकसित करण्यात आले आहे.

 

हा उपक्रम टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या व्यापक वचनबद्धतेचा भाग असून, 2030 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमधील 45 आयटीआय संस्थांच्या विकासाला पाठिंबा देण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक व्यापक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि सतत बदलत असलेल्या ऑटोमोबाईल उद्योगाच्या गरजांशी त्यांचे कौशल्य जुळवून घेता येईल, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

 

भारत देश हा विकसित भारत 2047 या व्हिजनकडे वाटचाल करत असताना, उद्योगमान्य कौशल्यांचा समान संधी उपलब्ध करून देणे, समुदायांना उन्नत करणे आणि अधिक सक्षम भविष्य घडवणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मत टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या कॉर्पोरेट अफेअर्स आणि गव्हर्नन्स विभागाचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट विक्रम गुलाटी यांनी सांगितले.

 

आयटीआय उन्नतीकरण उपक्रम हा भारत सरकारच्या स्किल इंडिया मिशनला पूरक आहे. या मिशनचा उद्देश आयटीआय संस्थांना बळकट करणे आणि तरुणांना भविष्यासाठी आवश्यक कौशल्यांनी सक्षम करणे हा आहे. टोयोटाची महाराष्ट्र शासनासोबतची भागीदारी या राष्ट्रीय मिशनला अधिक बळकट करते. जागतिक दर्जाचे उत्पादन कौशल्य उपलब्ध करून देत, प्रादेशिक स्तरावरील कौशल्य विकासातील आव्हानांवर मात करण्यास ही भागीदारी महत्वाची ठरणार आहे.

 

 

 

टोयोटा किर्लोस्कर मोटर बद्दल

 

 

 

1997 मध्ये स्थापन झालेली टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. (TKM) ही भारतात जागतिक दर्जाची वाहने तयार करण्यास आणि मानवी क्षमतांचा विकास करण्यास साधण्यास आहे. “Grow India – Grow with India” या आपल्या ध्येयवाक्याने प्रेरित होऊन, TKM औद्योगिक उत्कृष्टतेला सामाजिक जबाबदारीशी जोडते. शिक्षण, पर्यावरण, कौशल्य विकास आणि समुदाय कल्याण या क्षेत्रांतील उपक्रमांद्वारे कंपनी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीस हा

तभार लावते.

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments