Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedकामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली पहिली "जागतिक शांतता" आव्हान रॅली संपन्न 

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली पहिली “जागतिक शांतता” आव्हान रॅली संपन्न 

ते लो

 

पिंपरी(प्रतिनिधी) दि.८ मार्च २०२६:– आखाती देशातील युद्ध थांबवावे व जगात शांतता नांदावी या करीता संत तुकाराम नगर येथे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली “जागतिक शांतता” आव्हान रॅली संपन्न झाली.त्यांनी संत तुकाराम महाराज हॉल येथे श्रमिकांना संबोधित केले.या रॅलीमध्ये शेकडो श्रमिक व पिंपरी चिंचवड वाशीय सहभागी झाले होते. रॅली वेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. संत तुकाराम महाराज पुतळ्याचे दर्शन घेऊन रॅलीला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर पंचशील बौद्ध विहारांमध्ये भगवान गौतम बुद्धांना वंदन करून पुढे श्री गणेश मंदिरात दर्शन घेतले.सर्व जाती धर्माच्या स्थळांना भेट देऊन जागतिक शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली. मृत्यू झालेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने संत तुकाराम महाराज हॉल येथे रॅली ची सांगता झाली.

 

यावेळी भाजपाचे शहर पदाधिकारी मंगेश धाडगे, मुन्ना बाविस्कर, दिनेश पाटील, दिपक पाटील, नंदू कदम, अमोल घोरपडे, शंकरराव शितोळे, ओंकार जोखारे, राहुल शितोळे, लता पाटील, अंकुश वाघमारे ,स्वानंद राजपाठक, ईश्वर गायकवाड, शंकरराव गावडे, सतीश एरंडे यांनी रॅलीचे आयोजन केले होते.

 

जागतीक शांतता रॅलीला संबोधित करताना कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, अमेरिकेने इजराइलच्या साह्याने इराणवर जो आघात केला त्यामुळे इराणचे प्रमुख नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. हवाई तळाची जागा ज्या देशाने युद्धासाठी उपलब्ध करून दिली त्या आखातातील सर्वच देशांना याचे परिणाम भोगावे लागले आहेत. भारतालाही याचे परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवले आहेत कारण अमेरिका, यूएई,दुबई सहित सर्वच आखाती देशात लाखो भारतीय नागरिक अडकले आहेत. अडकलेल्या भारतीय नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात सुखरूप आणण्यासाठी आवाहन केल्यानंतर त्यांच्या म्हणण्यानुसार इराणन सहित इतर देशांनी युद्ध थांबवून विमानाने भारतीय सुखरूप देशात पोहोचले. याचे सर्व श्रेय भारत सरकारच्या परराष्ट्र धोरणाला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. भारत सरकारने अवलंबलेल्या परराष्ट्र धोरणाचा चांगला परिणाम युद्धाच्या काळात दिसून येत आहे. कारण जगात युद्ध चालू असताना भारत स्थिर असून नागरिक शांतपणे झोप घेत आणि दैनदिन कार्य करत आहेत.

 

युद्ध वाढल्यास याचे परिणाम सर्व जगाला भोगावे लागतील. बाजारातील सर्वच जीवन आवश्यक वस्तू महागतील याचा परिणाम भारतीयांना भोगावा लागेल.युद्धामध्ये निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जात आहे. जगावर आर्थिक संकट निर्माण झाले असून त्यामुळे युद्ध थांबावे व जगात शांतता प्रस्थापित व्हावी या हेतूने भाजप प्रणित राष्ट्रीय श्रमिक आघाडी तसेच शेकडो श्रमिकांच्या वतीने जगातील पहिली भव्य शांतता आवाहन रॅली काढण्यात आली. या रॅलीचा आदर्श घेऊन जगातील सर्वच देश जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करतील. शांतता प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा. आठ दिवसात युद्ध थांबेल अशी आशा करून “युद्ध नको शांतता हवी” यासाठी जगातील पहिली जागतिक शांतता रॅली पिंपरी चिंचवड शहरात काढण्यात आली. परराष्ट्र धोरण योग्य राबवल्या मुळे व शांतता प्रस्थापित केल्या मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात आले.तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारचा अभिनंदन ठराव करण्यात आल्याचे मत कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी व्यक्त केले

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments