Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (पीआयबीएम ) चा १६ वा दीक्षांत समारंभ...

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (पीआयबीएम ) चा १६ वा दीक्षांत समारंभ भारताच्या भविष्यास आकार देण्यात आणि जागतिक प्रतिमा बळकट करण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची भूमिका बजावेल – केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ

पुणे, ७ मार्च २०२६ : पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (पीआयबीएम) येथे शनिवारी संस्थेचा १६ वा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. भारत सरकारचे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केंद्रीय जल शक्ती राज्य मंत्री राज भूषण चौधरी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते . चॉईस एएमसी चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष जैन व ग्रॅण्ट थॉर्नटन भारत एलएलपी चे भागीदार अंकित चुग, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ .मनोहर चासकर, मुबिया इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक कवलदीप सिंग, शॉपर्स स्टॉप चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी कवींद्र मिश्रा

हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी पीआयबीएम चे अध्यक्ष रमणप्रीत यांनी सर्वांचे स्वागत केले.

 

या वेळी बोलताना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ म्हणाले की, देश २०४७ कडे म्हणजे स्वातंत्र्याच्या १०० वर्षांच्या दिशेने वाटचाल करत असताना आजचे तरुण हेच विकसित भारताचे खरे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. भारतात ३० वर्षांखालील ६० कोटींहून अधिक तरुण लोकसंख्या आहे, जी देशाची मोठी ताकद आहे. ही तरुणाई देशाची ऊर्जा, उत्साह आणि प्रेरणा दर्शवते. सध्याच्या विकासाच्या गतीमुळे भारत प्रगतीच्या अटळ मार्गावर आहे, असे त्यांनी नमूद केले.

 

दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या एआय परिषदेला अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल होते . कृत्रिम बुद्धिमत्ता मुळे नोकऱ्या कमी होतील हा दृष्टीकोन दूर करण्यात या परिषदेमुळे मदत झाली. एआय भारताच्या भविष्यास आकार देण्यात आणि जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा अधिक मजबूत करण्यात मोठी भूमिका बजावेल, असे त्यांनी सांगितले.

 

आजच्या तरुणांसाठी एआय हे एक महत्त्वाचे क्षेत्र बनले असून आरोग्यसेवा, शेती, शहरी व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थेसारख्या अनेक क्षेत्रांच्या विकासात ते सहाय्यक ठरेल. एआय नोकऱ्या काढून घेईल या भीतीतून बाहेर पडण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय तरुण जगातील इतर देशांतील तरुणांइतकेच सक्षम आणि प्रतिभावान आहेत. स्टार्ट-अप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आधीपासूनच नवकल्पना आणि आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.

 

 

पीआयबीएम चे अध्यक्ष रमणप्रीत यांनी सांगितले की कौशल्याधारित शिक्षणामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात आणि रोजगारक्षमता वाढते. तरुणांनी कंपन्यांमध्ये नोकरी किंवा स्वतःचे उद्योगही सुरू करू शकतात. काहीतरी अर्थपूर्ण निर्माण करण्यासाठी स्पष्ट दृष्टीकोन, उद्दिष्टांबद्दल शिस्तबद्ध विचार आणि ठाम हेतू आवश्यक असतो. अपयश आले तरीही या मार्गावर ठाम राहिल्यास शेवटी उद्दिष्ट साध्य करता येते.आजच्या काळात लाखो विद्यार्थी उच्च कौशल्यांसह पदवीधर होत असताना एखाद्या व्यक्तीला वेगळेपण देणारी गोष्ट म्हणजे चिकाटी आणि सतत प्रगती करण्याची जिद्द. आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्पष्ट ध्येय आणि उद्दिष्ट आवश्यक आहे. या ध्येयाला दृढ इच्छाशक्ती, शिस्त आणि कठोर परिश्रमाची जोड दिल्यास केवळ स्वतःचे यश मिळत नाही तर समाजालाही सकारात्मक लाभ होतो.

 

दीक्षांत समारंभात बिझनेस ॲनालिटिक्स, एचआर, फायनान्स, मार्केटिंग, एचआर ॲनालिटिक्स, मार्केटिंग ॲनालिटिक्स आणि मार्केटिंग ऑपरेशन्स ह्या अभ्यासक्रमातील ७०४ विद्यार्थ्यांना पिजिडीएम पदवी प्रदान करण्यात आली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments