Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedपक्की अनुज्ञप्तीसाठी १० व ११ मार्च रोजी वाहन चाचणी सकाळच्या सत्रात*

पक्की अनुज्ञप्तीसाठी १० व ११ मार्च रोजी वाहन चाचणी सकाळच्या सत्रात*

 

 

पुणे, दि. 9 (जिमाका, वृत्तसेवा): पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या आस्थापनेवरील रिक्त पोलीस शिपाई (चालक) पदाच्या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्जदारांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी दि. १० व ११ मार्च २०२६ रोजी मे. आयडीटीआर, नाशिक फाटा, कासारवाडी, पुणे येथे दुपारच्या सत्रात आयोजित करण्यात आली आहे.

 

त्या अनुषंगाने, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड मार्फत ज्या उमेदवारांनी पक्की अनुज्ञप्तीसाठी अर्ज करून दि. १० व ११ मार्च २०२६ रोजी वाहन चाचणीसाठी अपॉइंटमेंट घेतली आहे, त्या सर्व उमेदवारांची वाहन चाचणी मे. आयडीटीआर, नाशिक फाटा, कासारवाडी, पुणे येथे सकाळी ७ वाजल्यापासून घेण्यात येणार आहे. अपॉइंटमेंट घेतलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांना नेमून दिलेल्या वेळेपूर्वी सकाळच्या सत्रात वाहन चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड यांच्यावतीने करण्यात आले आहे.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments