पुणे : ओपश सोशिओ कमर्शिअल प्रा. लि. या पुणेस्थित कंपनीने ८ मार्च २०२० रोजी ‘तारिणी’ नावाने उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमांतर्गत कार्यालयीन ठिकाणी महिलांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध कुठे व कशाप्रकारे तक्रार करावी, याबाबत मार्गदर्शन केले जाते तसेच महिलांना त्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांची माहिती दिली जाते. तारिणी या हेल्पलाईन मार्फत गेल्या ५ वर्षात १५०० हुन अधिक उपभोगतांना मार्गदर्शन केले आहे.यावर सर्वसाधारणपणे ८०% कॉल हे पॉश निगडित तक्रारींसाठी असून,२०% इतर काही तक्रारींकरिता नोंदवले गेले आहेत.
यंदाच्या जागतिक महिला दिनानिमित्त २ मार्च ते ७ मार्च २०२६ या कालावधीत ‘तारिणी’ उपक्रमांतर्गत समाजातील विविध घटकांतील महिलांसाठी पॉश (कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध व निवारण) कायद्याबाबत मोफत मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले. ही सत्र पुण्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या आठ संस्थांमध्ये घेण्यात आली. अमेय जोशी, अदिती देशपांडे व राधिका कुलकर्णी या ओपशच्या टीम मधील तिघांनी सदर सत्रांद्वारे मार्गदर्शन केले.
या उपक्रमात गुडविल इंडिया ही स्वयंसेवी संस्था, म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डी, एस. टी. महामंडळ, अंगणवाडी, बचत गट आणि घरकाम करणाऱ्या कर्वे नगर वस्तीमधील महिला, जनता सहकारी बँक, पंचायत समिती राजगुरूनगर, वंचित विकास संस्था तसेच पुणे महानगरपालिका अंतर्गत कार्यरत स्वच्छ या संस्थांचा समावेश होता.
२ मार्च ते ७ मार्च २०२६ या कालावधीत पुण्यातील सर्वसाधारणपणे ५०० महिला व पुरुषांनी या सत्रांचा लाभ घेतला. ‘तारिणी’ उपक्रमाच्या माध्यमातून कार्यस्थळी सुरक्षित आणि जागरूक वातावरण निर्माण करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.
तारिणी संपर्क क्रमांक – ७०३०४३
४३४३


