Wednesday, October 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवीन ऑडी एसक्‍यू८ साठी बुकिंग्‍जना सुरूवात

नवीन ऑडी एसक्‍यू८ साठी बुकिंग्‍जना सुरूवात

१७ मार्च २०२६ रोजी लॉंच करण्‍यात येणार.

ऑडी इंडिया वेबसाइट www.audi.in आणि मायऑडी कनेक्‍ट अॅपच्‍या माध्‍यमातून ऑनलाइन बुकिंग करता येऊ शकते.

सुरूवातीची बुकिंग रक्‍कम ५,००,००० रूपये आहे.

पुणे, १० मार्च २०२६: ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज भारतात नवीन ऑडी एसक्‍यू८ साठी बुकिंग्‍जना सुरूवात केली. ही एसयसूव्‍ही ऑडी इंडियाच्‍या वेबसाइटच्‍या माध्‍यमातून किंवा मायऑडी कनेक्‍ट अॅप्‍लीकेशनवर ५,००,००० रूपयांची सुरवातीची बुकिंग रक्‍कम देत बुक करता येऊ शकते.आँडीच्या ताफ्यात ही नवी लक्झुरी गाडी येत्या १७ मार्च २०२६ रोजी दाखल होत आहे.

ऑडीच्या क्‍यू श्रेणीमध्‍ये धोरणात्‍मकरित्‍या स्थित नवीन ऑडी एसक्‍यू८ मध्‍ये ४.०-लिटर व्‍ही८ टीएफएसआय इंजिनची शक्‍ती आहे, जे ३७३ केडब्‍ल्‍यू शक्‍ती आणि ७७० एनएम टॉर्कची निर्मिती करते. सेल्‍फ-लॉकिंग सेंटर डिफरेन्शिअल, अॅडप्टिव्‍ह एअर सस्‍पेंशर स्‍पोर्ट आणि ऑल-व्‍हील स्‍टीअरिंग असलेल्‍या ऑडीच्‍या क्‍वॉट्रो परमनण्‍ट ऑल-व्‍हील ड्राइव्‍हसह सुसज्‍ज ऑडी एसक्‍यू८ गतीशील व उत्‍साहवर्धक ड्रायव्हिंग अनुभव देते.

ऑडी इंडियाचे ब्रँड डायरेक्‍टर श्री. बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, “ऑडी एसक्‍यू८ दैनंदिन लक्‍झरी आणि अद्वितीय स्‍पोर्टी कार्यक्षमतेमधील परिपूर्ण संयोजनाला सादर करते. या एसयूव्‍हीमधील शक्तिशाली इंजिन आणि विशिष्‍ट एस कॅरेक्‍टर या एसयूव्‍हीला परिपूर्ण एसयूव्‍ही बनवतात. भारतात आमच्‍या ऑडी क्‍यू८ फॅमिलीसाठी मिळालेल्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादासह आमचा विश्वास आहे की, नवीन ऑडी एसक्‍यू८ समकालीन लक्‍झरी एसयूव्‍हीपेक्षा अधिक पैलूंचा शोध घेत असलेल्‍या ग्राहकांचे मुख्यत्वे लक्ष वेधून घेईल. आम्‍हाला बुकिंग्‍ज सुरू करण्‍याचा आनंद होत आहे, तसेच आम्‍ही परफॉर्मन्‍स प्रेमींना लवकरात लवकर ऑडी एसक्‍यू८ बुक करण्‍याचे आवाहन करतो, कारण ही एसयूव्‍ही मर्यादित कालावधीसाठी उपलब्‍ध असणार आहे

.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments