गुरूग्राम, मार्च १०, २०२६: ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)ने आज त्यांची गतीशील व ट्रेण्डसेटिंग कॉम्पॅक्ट एसयूव्ही ‘ऑल-न्यू ह्युंदाई वेन्यू’साठी १ लाख बुकिंग्जचा टप्पा पार करण्याची घोषणा केली. या महत्त्वपूर्ण टप्प्याला साजरे करत आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीमधील आपले स्थान अधिक प्रबळ करत कंपनीने नवीन एचएक्स८ डिझेल ऑटोमॅटिक (एटी) व्हेरिएण्टच्या लाँचची देखील घोषणा केली, ज्यामध्ये भारतातील आधुनिक ग्राहकांसाठी अधिक सोयीसुविधा व कार्यक्षमता आहे. नवीन एचएक्स८ डिझेल एटी व्हेरिएण्टच्या लाँचसह प्रभावी गतीशीलतेसह शक्तिशाली कार्यक्षमतेचा शोध घेत असलेल्या ग्राहकांसाठी ह्युंदाई वेन्यूची उपलब्धता अधिक वाढली आहे. नवीन व्हेरिएण्टमध्ये प्रमाणित यू२ १.५ लिटर सीआरडीआय डिझेल इंजिनची शक्ती आहे, ज्यासोबत ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे, ज्यामधून प्रगत तंत्रज्ञान, अधिक आरामदायीपणा आणि सुधारित कार्यक्षमता मिळते. यासह अत्याधुनिक व आरामदायी ड्रायव्हिंग अनुभवाचा शोध घेत असलेल्या ग्राहकांसाठी ह्युंदाई वेन्यूचा अपील अधिक प्रबळ झाला आहे.
नवीन एचएक्स८ डिझेल एटी व्हेरिएण्टमध्ये आरामदायीपणा, सुरक्षितता व सोयीसुविधा वैशिष्ट्यांची अपग्रेडेड श्रेणी आहे, जसे:
· फ्रण्ट रो व्हेण्टिलेटेड सीट्स
· ड्युअल टोन लेदरेट सीट्ससह वेन्यू ब्रँडिंग
· इलेक्ट्रिक ४-वे ड्रायव्हर सीट अॅडजस्ट
· कंट्रोलर ओव्हर-द-एअर (ओटीए) वेईकल अपडेट्स
· ह्युंदाई ब्लूलिंक (कनेक्टेड कार तंत्रज्ञान)
· इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेकसह ऑटो होल्ड
· रिअर डिस्क ब्रेक्स
· अॅम्बियण्ट लायटिंग – क्रॅश पॅड व सेंट्रल कन्सोल
· ड्राइव्ह मोड सिलेक्ट्स (इको, नॉर्मल, स्पोर्ट)
· ट्रॅक्शन कंट्रोल मोड्स (सँड, मड, स्नो)
· पॅडल शिफ्टर्स
१ लाख बुकिंग्जचा टप्पा पार करण्याबाबत, तसेच नवीन एचएक्स८ डिझेल एटी व्हेरिएण्टच्या लाँचबाबत मत व्यक्त करत ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ श्री. तरूण गर्ग म्हणाले, ”आम्हाला आनंद होत आहे की, नवीन ह्युंदाई वेन्यूने १ लाख बुकिंग्जचा टप्पा पार केला आहे, ज्यामधून भारतातील ग्राहकांनी आमच्या ब्रँडवर दाखवलेला प्रबळ विश्वास दिसून येतो. तसेच, या महत्त्वपूर्ण टप्प्यामधून दैनंदिन ड्रायव्हिंगला अधिक उत्साहवर्धक करणाऱ्या स्मार्ट, कनेक्टेड व वैशिष्ट्य-संपन्न गतीशीलता सोल्यूशन्ससाठी वाढती महत्त्वाकांक्षा देखील निदर्शनास येते. लाँच करण्यात आलेले नवीन एचएक्स८ डिझेल ऑटोमॅटिक व्हेरिएण्ट वेन्यू लाइनअपला अधिक दृढ करते, तसेच ग्राहकांना डिझेल कार्यक्षमता, टॉर्क-संपन्न कार्यक्षमता आणि प्रभावी सोयीसुविधेचे परिपूर्ण संयोजन देते. यामधून प्रगत तंत्रज्ञान व उच्च दर्जाचे मूल्य यांचे पाठबळ असलेले अर्थपूर्ण पर्याय प्रदान करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. ह्युंदाईमध्ये आम्ही भविष्यासाठी सुसज्ज उत्पादने वितरित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, जे ग्राहकांच्या सर्वसमावेशक अपेक्षांची पूर्तता करतील आणि भारतातील गतीशीलतेच्या भावी टप्प्याला चालना देतील.”
देशातील ह्युंदाईच्या व्यापक विक्री व सेवा नेटवर्कचे पाठबळ असलेली ह्युंदाई वेन्यू वैशिष्ट्य-संपन्न, आरामदायी व भविष्यासाठी सुसज्ज कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा शोध घेत असलेल्या ग्राहकांकरिता लक्षवेधक तत्त्व आहे. हयुंदाई मोटर इंडिया लिमिटेड ग्राहकांना प्रगत तंत्रज्ञान, सुरक्षितता, आरामदायीपणा व मूल्याचे लक्षवेधक संयोजन देण्याप्रती, तसेच ग्राहकांच्या सर्वसमावेशक पसंतींची पूर्तता करण्यासाठी आपल्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये सतत नाविन्यता आणण्याप्रती कटिबद्ध आहे.
अधिक माहितीसाठी hyundai.co.in येथे लॉग ऑन करा.


