Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedएफ टी आय आय (FTII) च्या सदस्यपदी मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद...

एफ टी आय आय (FTII) च्या सदस्यपदी मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद लेले यांची निवड🔹

🔹

▪️पुणे दि. ९ – राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) सदस्यपदी पुण्यातील मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष आणि चित्रपट निर्माते, दिग्दर्शक मिलिंद लेले यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी अभिनेते आर. माधवन यांची मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात नियुक्ती करण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून एफटीआयआय संस्थेच्या तज्ज्ञमंडळ समिती, सदस्य समिती, संस्थेतील माजी विद्यार्थी गटातील सदस्यांच्या समितीची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली. लेले यांच्यासह अनंत विजय, जादूमोनी दत्ता, पद्मजा फेणाणी जोगळेकर, मनोज जोशी, पल्लवी जोशी, निशिगंधा वाड यांच्यासह अमृता रायचंद अशा एकूण आठ सदस्यांची निवड आज करण्यात आली आहे.
▪️ याशिवाय तज्ज्ञ समितीमध्ये निधी पांडे, मुग्धा सिन्हा आणि वृंदा देसाई तर माजी विद्यार्थी सदस्य समितीमध्ये सुभाष साहू,सतीश शहा,सुधीर पांडे आणि अरुणा पाटील या चार जणांची निवड करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments