Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedवर्गमित्रांकडून ‘सहजीवन’ वृद्धाश्रमाला ७५ हजारांची मदत* डॉ. दिलीप देवधर यांच्या पंचत्तरीनिमित्त...

वर्गमित्रांकडून ‘सहजीवन’ वृद्धाश्रमाला ७५ हजारांची मदत* डॉ. दिलीप देवधर यांच्या पंचत्तरीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात मदत

 

 

पुणे : डॉ. दिलीप देवधर यांच्या पंचत्तरीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात त्यांच्या वर्गमित्रांकडून ‘सहजीवन’ या वृद्धाश्रमासाठी ७५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत वृद्धांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या या उपक्रमाला या मदतीमुळे एक आगळावेगळा पंचाहत्तरीचा सोहळा साजरा झाला.

 

शहरातील प्रसिद्ध फॅमिली डॉक्टर आणि ‘सहजीवन’ या वृद्धाश्रमाचे संस्थापक डॉ. दिलीप देवधर यांच्या पंचत्तरीनिमित्त त्यांच्या रुग्णांकडून व चाहत्यांकडून कर्वे रस्त्याजवळील अश्वमेध कार्यालय येथे भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक सतीश आळेकर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी माजी खासदार व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, डॉ. अविनाश भोंडवे, तसेच ज्येष्ठ गायक रविंद्र साठे आदी मान्यवर देखील उपस्थित होते.

 

सतीश आळेकर म्हणाले, वैद्यकीय सेवेबद्दल विविध प्रवाद होत असताना डॉ. देवधर यांच्यासारखे अचूक निदान करून अनावश्यक चाचण्या टाळणारे डॉक्टर दुर्मिळ होत आहेत. कोविड काळात कोणतीही बुवाबाजी न करता त्यांनी रुग्णांना दिलेला आधार अत्यंत मोलाचा ठरला, असेही त्यांनी सांगितले.

 

ग्राहक पेठेचे संचालक आणि डॉ. देवधर यांचे वर्गमित्र सूर्यकांत पाठक म्हणाले, चार-पाच पिढ्यांचे कौटुंबिक डॉक्टर म्हणून देवधर यांनी असंख्य कुटुंबांशी स्नेहाचे नाते निर्माण केले आहे. अनेक रुग्णांना आर्थिक अडचणीतही त्यांनी विनामूल्य उपचार देऊन मोठा आधार दिला, याचीही त्यांनी उदाहरणे सांगितली.

 

डॉ. दिलीप देवधर म्हणाले, पंचाहत्तरीनंतर काय करणार, असा प्रश्न अनेक जण विचारतात. पण माझे उत्तर एकच अजून कामच करणार. स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्याप्रमाणे इतरांसाठी जगणे हेच खरे जीवन आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबासाठी, रुग्णांसाठी आणि वृद्धाश्रमातील बांधवांसाठी कार्यरत राहण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आलोक देवधर आणि सुप्रसिद्ध गायिका मंजुषा पाटील यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments