पुणे, दि. 20 (जिमाका, वृत्तसेवा): दिनांक २० मार्च २०२६ किंवा २१मार्च २०२६ रोजी (चंद्र दर्शनानुसार) ईद निमित्त ईदगाह मैदान, गोळीबार मैदान चौक परिसरात सामुहिक नमाज पठण होणार आहे. त्यावेळी वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ शकते, त्यामुळे वाहतूक पोलीसांनी तात्पुरती वाहतूक व्यवस्था राबविली जाईल.
सकाळी ०६.०० ते ११.३० वाजेपर्यंत गोळीबार चौक परिसरातील सर्व वाहने आवश्यकतेनुसार पर्यायी मार्गे वळविण्यात येतील.
जड वाहने: सोलापूर रोड, लुल्लानगर, खटाव बंगला मार्गे व इतर पर्यायी मार्ग वापरून प्रवास करतील; पुणे स्टेशनकडे जाणारी जड वाहने पूर्णतः बंद राहतील.
हलकी वाहने: इम्प्रेस गार्डन रोड, बीशप स्कूल मार्गे इच्छित स्थळी जातील.
मम्मादेवी चौक ते गोळीबार चौक, जुनी सोलापूर बाजार चौक ते गोळीबार चौक याठिकाणी वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.
शहरातील अन्य ईदगाह मैदानांवर होणाऱ्या नमाज पठणानुसार संबंधित भागातील वाहतूक परिस्थितीनुसार बंद अथवा पर्यायी मार्गे वळविली जाईल.
वाहन चालकांनी वाहतूक पोलीसांचे मार्गदर्शन पाळून संभाव्य गैरसोय टाळावी असे आवाहन पोलीस उप-आयुक्त, वाहतूक पुणे शहर हिंमत जाधव यांनी केले आहे.
000


