Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedव्हीजेएसएटी' परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव* *जाधवर इन्स्टिट्यूट आणि विचार एज्युकेशन यांच्या...

व्हीजेएसएटी’ परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव* *जाधवर इन्स्टिट्यूट आणि विचार एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा तयारीसाठी आयोजन ; डॉ. संजय चोरडिया यांनी जाहीर केलेल्या मेरिट स्कॉलरशिपचे वितरण*

पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि विचार एज्युकेशन च्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने उपयुक्त व्हीजेएसएटी परीक्षा नऱ्हे येथील जाधवर इन्स्टिट्यूट मध्ये पार पडली. परीक्षेत अव्वल गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गौरव करण्यात आला.

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी जाहीर केलेल्या देणगीतून यशस्वी विद्यार्थ्यांना मेरिट स्कॉलरशिप देण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर, विचार एज्युकेशन चे संचालक विवेक गुप्ता यावेळी उपस्थित होते. स्पर्धेत विनीत कवळे,सोहम पाठक, मोईज मकंदर, रोशनी घडी, यांनी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. अनुजा गुंड, प्रथमेश चौगुले, वैष्णवी गवारे, यांनी द्वितीय सिद्धेश भडांबे अथर्व शिंदे आदित्य इंगोले सार्थक वाईंगे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

ॲड. शार्दुल जाधवर म्हणाले, भविष्यामध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी, या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आली. बहुपर्यायी पद्धतीने विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विजेत्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या रकमेतून रोख बक्षीसे देण्यात आली. दैनंदिन अभ्यासक्रमासोबतचा स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी यशस्वी होण्याच्या दृष्टीने संस्था तयारी करून घेत आहे. स्पर्धेच्या काळात ही तयारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments