Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorized*हडपसर श्रीराम मंदिर ट्रस्ट तर्फे रामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*

*हडपसर श्रीराम मंदिर ट्रस्ट तर्फे रामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*

 

 

श्रीराम मंदिर ट्रस्ट ,हडपसर यांच्यातर्फे मंदिर जीर्णोद्धार आणि आगामी रामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत .

हडपसरच्या विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात प्रभू श्रीरामांच्या जीवनपटाची नाटिका सादर करण्यात आली . यामध्ये आबालवृद्ध नवोदित कलाकारांनी भाग घेतला होता .

श्रीराम मंदिर ट्रस्टतर्फे गुरुवार २६मार्च रोजी रामनवमी सोहळा आणि अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . या कार्यक्रमांस भाविकांनी सढळ हाताने मदत करावी तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष श्री रजनीकांतजी बिरला यांनी केले आहे .

 

सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला

ज्येष्ठ मातांचा आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात आले .

दामोदर रामदासी यांनी एकपात्री नाटिका सादर केली.

या कार्यक्रमातील भाषणात

गोसेवा आयोगाचे राज्यमंत्री श्री .शेखरजी मुंदडा यांनी सर्व मंदिरांनी गोसेवेचा वसा घेण्यात पुढाकार घेण्यासाठी आवाहन केले .

श्री प्रशांत राठी यानी सर्वांचे आभार मानले.

यावेळी श्रीराम मंदिर ट्रस्ट चे उपाध्यक्ष श्री सत्यनारायणजी मूंदड़ा, ट्रेजरर श्री विजयजी राठी व इतर सर्व पदाधिकारी, नगरसेवक श्री मारुतीजी तुपे व नगरसेविका पायलजी तुपे ,कार्यक्रमाचे प्रायोजक आणि भाजप चे श्री .शामसुंदरजी कलंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments