Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedज्येष्ठ उद्योगपती श्री. अभय फीरोदीया यांना २०२६ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर "

ज्येष्ठ उद्योगपती श्री. अभय फीरोदीया यांना २०२६ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर “

 

वाहन उद्योग क्षेत्रातील‌ अतुलनीय योगदानाबद्दल २०२६ चा पुण्यभूषण पुरस्कार ,ज्येष्ठ उद्योगपती श्री. अभय फिरोदीया यांना डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे अध्यक्षतेखाली निवड समितीने देण्याचे निश्चित केले आहे.त्याचवेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांनाही गौरवण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतिश देसाई यांनी कळविले आहे .पुरस्काराचे यंदाचे ३८ वे वर्ष आहे ,सलग ३७ वर्षे संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात आणि देशाच्या बाहेर ह्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराचा भव्य उपक्रम राबविला. अवघे मोगल साम्राज्य हादरवून‌ टाकणाऱ्या बालशिवाजीची ,सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिकृती या नगरीच्या ग्रामदैवतासह वैशिष्ट्यपूर्ण‌ अशा पुण्यभूषण पुरस्काराच्या स्मृतीचिन्हात आहे .रु. २’०००००( रुपये दोन‌लक्ष ) रकमेची थैलीही सन्मानित पुणेकरास दिली जाते. यापूर्वी विविध क्षेत्रातील आपल्या अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव जगभर पोचविणाऱ्या सदतीस ज्येष्ठ पुणेकरांना गौरविण्यात आले होते. महामहिम राष्ट्रपती श्री. प्रणब मुखर्जी ,डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम ,उपराष्ट्रपती श्री.हमीद अन्सारी ,मा. श्री. व्यंकय्या नायडू , ,माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी ,सभापती सोमनाथ चटर्जी ,श्री मनोहर जोशी ,मा.ना. शरद पवार

,स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर ,क्रिकेटपटू कपिल देव व सचिन तेंडुलकर ,पांडुरंगशास्त्री आठवले ,विलासराव देशमुख ,ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार ,वसंतराव साठे ,नानासाहेब गोरे ,तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रम्हण्यम् ,मधु दंडवते , दि हिंदूचे संपादक एन. राम ,न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी ,श्री सुशिलकुमार शिंदे ,मा. श्री सिताराम येचुरी ,श्री गिरीश कर्नाड ,ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस. एल .भैरप्पा,श्री महेश एलकुंचवार ,मा. श्री पृथ्वीराज चव्हाण ,डॉ. विकास आमटे ,आशा भोसले ,श्री नारायणमूर्थी ,श्री शरद यादव ,मा. श्री नितिन गडकरी ,पं. हरीप्रसाद चौरसीया ,पं.‌अमजदअली खान‌ व पं. शिवकुमार शर्मा , मा. श्री प्रफुल्ल पटेल‌,ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर‌ व ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आदी मान्यवरांनी पुण्यभूषण पुरस्कार प्रदान‌ करुन नामांकीत पुणेकरांचा यथोचीत सन्मान‌केला आहे.याबरोबर कर्तव्य बजावीत असताना जखमी झालेल्या ५ जवानांचा मान्यवरांच्या शुभहह्ते यथोचीत गौरव करण्यात येतो.पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी ,भारतातील दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात सदर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments