Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedपी.एन.गाडगीळ ज्वेलर्सने गाठला महत्त्वाचा टप्पा · 10,000 कोटी रूपये महसूलाचा टप्पा...

पी.एन.गाडगीळ ज्वेलर्सने गाठला महत्त्वाचा टप्पा · 10,000 कोटी रूपये महसूलाचा टप्पा पार,गुढी पाडव्याच्या दिवशी दागिने विक्रीत वर्षागणिक विक्रीत 38 टक्के वाढ  

 

 

पी.एन.गाडगीळ ज्वेलर्सने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 10,000 कोटी रूपये महसूलाचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. हा महत्त्वाचा टप्पा व्यवसायातील मजबूत गती दर्शवतो.शिवाय गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कंपनीने 170.7 कोटी रूपयांची विक्री केली असून मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 38 टक्के वाढ झाली आहे.

 

सोन्याचा विभाग हा महसूल वाढीसाठी मुख्य चालक ठरला असून याच्या महसूलात वर्षागणिक 35 टक्के वाढ झाली आहे.त्याचबरोबर हिरे आणि चांदीच्या विभागांनी अनुक्रमे 61 टक्के आणि 118 टक्के इतकी मजबूत वाढ दर्शवली आहे.

 

पी.एन.गाडगीळ ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.सौरभ गाडगीळ म्हणाले की, रूपये 10,000 कोटींच्या महसूलाचा टप्पा पार करणे हा आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा क्षण असून,हा टप्पा गाठण्याची आमची दीर्घकाळापासून आकांक्षा होती. हा टप्पा आमच्या ग्राहकांचा दृढ विश्वास आणि आमच्या कर्मचाऱ्यांची अथक समर्पणाचा पुरावा आहे.या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हे यश प्राप्त करणे शक्य झाले आहे.

 

गुढी पाडवा हा आमच्यासाठी नेहमीच महत्त्वाचा सण राहिला आहे.यावर्षी सोन्याच्या वाढलेल्या किमती असूनही यावर्षी आमच्या सर्व बाजारपेठांमध्ये ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला असून यामधून 170.7 कोटी रूपयांची विक्री झाली आहे.ही कामगिरी आमच्या ब्रँडची ताकद आणि विविध श्रेणी आणि बाजारपेठांमधील आमची सातत्यपूर्ण कामगिरी दर्शविते.

 

ही कामगिरी आम्ही अशाच प्रकारे कायम ठेवण्यावर आशावादी आहोत.सध्या सुरू असलेला लग्नसराईचा हंगाम,नवीन बाजारपेठांमध्ये सुरू असलेला विस्तार आणि आकर्षक डिझाईन्स आणि मूल्य देण्यावर असलेले आमचे सातत्यपूर्ण लक्ष यामुळे आम्ही आर्थिक वर्षाचा शेवट यशस्वीपणे करण्यासाठी सज्ज

आहोत.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments