Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorized*अल्पसंख्यांक पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन*

*अल्पसंख्यांक पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन*

 

 

पुणे, दि. २४ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत २७ मार्च २०२६ रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्ता पेठ, समर्थ पोलीस ठाणे समोर, पुणे येथे सकाळी १० वाजता अल्पसंख्यांक पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील ५ उद्योजकांनी त्यांचा सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून २५० पेक्षा जास्त रिक्तपदे भरण्यात येणार आहे. ही सर्व रिक्तपदे किमान १० वी, १२ वी, पदवीधर, डिप्लोमा अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक व बेरोजगार उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

 

इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांबाबत अधिक माहिती करुन घेण्यासोबतच अर्ज करण्याकरिता www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. खाजगी क्षेत्रातील विविध रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी अधिकाधिक नोकरी इच्छुक रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून, आपला सहभाग नोंदवावा व या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा.

 

नोकरी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस येताना सोबत आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, आवश्यकतेनुसार अर्जाच्या प्रती सोबत आणाव्यात, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, ४८१ रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे-४११०११ येथे प्रत्यक्ष अथवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय, पुणे यांनी केले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments