Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्रॉम्‍प्‍टनकडून दैनंदिन पोषण सहजपणे मिळण्‍यास मदत करण्‍यासाठी 'हेल्‍दी चॉईसेस मेड ईजीयर' अंतर्गत...

क्रॉम्‍प्‍टनकडून दैनंदिन पोषण सहजपणे मिळण्‍यास मदत करण्‍यासाठी ‘हेल्‍दी चॉईसेस मेड ईजीयर’ अंतर्गत अमिओ फ्रेश कोल्‍ड प्रेस ज्‍यूसर लाँच 

 

मुंबई, २३ मार्च २०२६ – आजच्‍या धावपळीच्‍या जीवनशैलीमध्‍ये संतुलित पोषण राखण्‍याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. अधिक वेळ कामकाज, व्‍यस्‍त वेळापत्रक आणि सहजपणे मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे दैनंदिन आहारामध्‍ये ताजी फळे व भाज्‍यांचा समावेश करणे आव्‍हानात्‍मक वाटू शकते. उत्तम स्‍वास्‍थ्‍यासाठी या वाढत्‍या गरजेची पूर्तता करत क्रॉप्‍टन ग्रीव्‍ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्‍स लि. या भारतातील सर्वात विश्वसनीय ग्राहक इलेक्ट्रिकल ब्रँडने क्रॉम्‍प्‍टन अमिओ फ्रेश कोल्‍ड प्रेस ज्‍यूसर लाँच केला आहे, जो दररोज आरोग्‍यदायी पर्याय सहजपणे उपलब्‍ध करून देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.

क्रॉम्‍प्‍टनच्‍या विश्वसनीयता व विचारशील नाविन्‍यतेच्‍या वारसावर आधारित अमिओ फ्रेश कोल्‍ड प्रेस ज्‍यूसर आरोग्‍यदायी, अधिक सुतंलित जीवनशैलीच्‍या दिशेने पहिले पाऊल उचलण्‍यास सज्‍ज असलेल्‍या ग्राहकांसाठी डिझाइन करण्‍यात आलला आहे. सौम्‍य कौल्‍ड प्रेस तंत्रज्ञानाची शक्ती असलेला हा ज्‍यूसर अधिक रस काढण्‍यासह त्‍यामधील आवश्‍यक पोषक घटक, जीवनसत्त्वे व अँटीऑक्सिडंट्स कायम ठेवतो, ज्‍यामुळे ज्‍यूस प्रत्‍येक ग्‍लास उत्तम पोषणाची खात्री देतो.

समकालीन ज्‍यूसिंग पद्धतींमध्‍ये उष्‍णता व उच्‍च गतीशील प्रक्रियेमुळे अनेकदा पोषक तत्वांचा ऱ्हास होतो. अमिओ फ्रेश कोल्‍ड प्रेस ज्‍यूसर संथ, सौम्‍य कोल्‍ड प्रेस मोटरचा वापर करत या समस्‍येचे निराकरण करतो, जेथे जवळपास ९० टक्‍के पोषण व जीवनसत्त्वे कायम ठेवतो*, तसेच फळे, भाज्‍या व नट्समधून संपन्‍न स्‍वाद व अधिक रस मिळण्‍याची खात्री देतो. अमिओ फ्रेशसह तुम्ही ताज्या फळांचे रस, पौष्टिक भाज्यांचे मिश्रण किंवा घरी बनवलेले क्रीमी नट-मिल्क सहज तयार करू शकता. याची सुलभ जोडणी आणि मोठ्या आकाराच्‍या डिझाइनमुळै पौष्टिक आहार मिळवणे आता अधिक सोयीस्कर झाले आहे.

क्रॉम्‍प्‍टन अमिओ फ्रेश कोल्‍ड प्रेस ज्‍यूसरची ठळक वैशिष्‍ट्ये

आधुनिक, आरोग्‍याप्रती जागरूक जीवनशैलींना पाठिंबा देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेला अमिओ फ्रेश कोल्‍ड प्रेस ज्‍यूसर प्रगत वैशिष्‍ट्यांसह येतो, जे दैनंदिन ज्‍यूस बनवण्‍याच्‍या प्रक्रियेला सोपे करतात:

• न्‍यूट्रि फ्रेश टेक्‍नॉलॉजी: प्‍युअर ज्‍यूस, प्‍युअर न्‍यूट्रिशन: यामध्ये युनिक ड्युअल-फिल्टर डिझाइन आणि २०० वॅटची स्लो ज्यूसिंग मोटर आहे, ज्यामुळे पोषक तत्वांचा कमीत-कमी ऱ्हास होऊन जास्तीत-जास्त रस बाहेर काढला जातो.

• ९० टक्‍क्‍यांपर्यंत पोषक तत्वे आणि जीवनसत्त्वे कायम: यामधील *सौम्य कोल्ड प्रेस मोटर आवश्यक जीवनसत्त्वे आणि अँटी-ऑक्सिडंट्स टिकवून ठेवते, ज्यामुळे तुम्हाला अधिक आरोग्यदायी जीवनशैली मिळते.

• तयारीसाठी कमी वेळ: १०८ मिमी रुंद मुखाच्या डिझाइनमुळे फळे किंवा भाज्यांचे जास्त तुकडे न करता तुम्ही अख्खी फळे सहजपणे ज्यूसरमध्ये टाकू शकता.

• वैविध्‍यपूर्ण ज्‍यूसिंग कार्यक्षमता: हे कडक फळे आणि भाज्यांमधून कार्यक्षमतेने रस काढते, तसेच यातून तुम्ही मऊ आणि क्रीमी नट मिल्क देखील बनवू शकता.

• वापरण्यास आणि देखभालीस सोपे: यात जोडणीसाठी सोपे असलेले फक्त ३ सुटे भाग, गळती रोखणारी तोटी, रस व चोथा गोळा करणारे कंटेनर्स, आणि साफसफाईचा ब्रश दिला आहे, ज्यामुळे रोजचा वापर आणि स्वच्छता अगदी सहजपणे होते.

क्रॉम्‍प्‍टन अमिओ फ्रेश कोल्‍ड प्रेस ज्‍यूसर गुंतागुंतीच्‍या प्रक्रियेऐवजी पोषणाला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबांसाठी उत्तम आहे. नोकरी-व्यवसाय करणारे व्यावसायिक, कुटुंबं आणि तरुण पिढीचा विचार करून हे अप्‍लायन्‍स डिझाइन करण्‍यात आले आहे. हे ज्यूसर विभक्त किंवा संयुक्त अशा दोन्ही प्रकारच्या कुटुंबांच्या स्वयंपाकघरात सहज सामावून जाते, ज्यामुळे दैनंदिन जीवनात ताज्या रसाचे नियमित सेवन करणे अधिक सोपे होते.

या लाँचबाबत मत व्‍यक्त करत क्रॉम्‍प्‍टन ग्रीव्‍ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्‍स लि.च्‍या स्‍मॉल डोमेटिस्‍क अप्‍लायन्‍सेसचे प्रमुख केतन चौधरी म्‍हणाले, ”क्रॉम्‍प्‍टनमध्‍ये आम्‍हाला माहित आहे की आजच्‍या ग्राहकांची आरोग्‍यदायी जीवन जगण्‍याची महत्त्वाकांक्षा आहे, पण व्‍यस्‍त वेळापत्रकामुळे आरोग्‍यासंदर्भात संतुलन राखण्‍यास संघर्ष करावा लागतो. अमिओ फ्रेश कोल्‍ड प्रेस ज्‍यूसरसह आमचा या संघर्षाला दूर करण्‍याचा आणि पोषणाला सोपे, सहजसाध्य व सातत्‍यपूर्ण करण्‍याचा मनसुबा आहे. न्‍यूट्रि फ्रेश टेक्‍नॉलॉजीची शक्ती आणि विचारशील डिझाइनसह हे उत्पादन रसाच्या प्रत्येक घोटातून जास्तीत-जास्त पोषण मिळण्याची खात्री देते, ज्यामुळे ग्राहकांना सहजतेने आणि आत्मविश्वासाने आरोग्यदायी निवडी करणे शक्य होईल. आम्‍ही कार्यक्षमतेसह व्‍यक्तींना दीर्घकालीन आरोग्‍यदायी सवयी अंगिकारण्‍यास सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. अमिओ फ्रेश कोल्ड प्रेस ज्यूसरमधून नाविन्यता, कार्यक्षमता आणि आरोग्यदायी जीवनशैलीप्रती क्रॉम्प्टनची कटिबद्धता दिसून येते, ज्‍यामधून खात्री मिळते की आरोग्‍यदायी पर्याय दैनंदिन जीवनाचा आपसूक भाग बनतील.”

क्रॉम्‍प्‍टन मिओ फ्रेश कोल्ड प्रेस ज्यूसर प्रमुख रिटेल आऊटलेट्स आणि आघाडीच्‍या ई-कॉमर्स प्‍लॅटफार्म्‍सवर उपलब्‍ध असेल. कार्यक्षमता, वापरण्‍यास सोपे व विश्वसनीय क्रॉम्‍प्‍टन अभियांत्रिकीच्‍या संयोजनासह हा ज्‍यूसर आरोग्‍यदायी राहणीमान स्‍वीकार करू पाहणाऱ्यांसाठी विश्वसनीय सोल्‍यूशन आहे, ज्याद्वारे तुम्ही दररोज ताज्या रसाचा आनंद घेऊ शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments