भारत, चेन्नई, १० मार्च २०२४: मेट्रोपोलिस फाऊंडेशन या भारताच्या आघाडीच्या निदान साखळी असलेल्या मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेडच्या सीएसआर विभागाने आज चेन्नईमध्ये मेडएंगेज अॅन्युअल समिट २०२४ च्या सहाव्या आवृत्तीचे आयोजन केले. मेट्रोपोलिसचा महत्त्वाचा सीएसआर उपक्रम म्हणून मेडएंगेज एक सर्वांगीण मेडिकल आऊटरीच प्रोग्राम म्हणून काम करते. त्यातून भारतातील तरूण वैद्यकीय बुद्धिमत्तेला चालना दिली जाते. मेट्रोपोलिसचे अध्यक्ष डॉ. सुशील शाह यांच्या स्वप्नातून साकार झालेल्या मेडएंगेजची रचना भारतातील आगामी आरोग्यसेवा व्यावसायिकांना संपूर्ण मार्गदर्शन, सहकार्य आणि दिशादर्शन करण्यासाठी केली गेली आहे.
या वर्षाच्या समिटमध्ये एकूण १.७ कोटी रूपयांच्या शिष्यवृत्ती ३०१ वैद्यकीय विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. त्यातील २९ विद्यार्थ्यांना संशोधन अनुदान देण्यात आले. मेडएंगेजच्या शिष्यवृत्ती पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांना एमडी/ एमएस/ डीएनबी वर्षांमध्ये प्रशिक्षण तसेच इंटर्नशिपचे वर्ष या कालावधीत ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शैक्षणिक गुणांमधील उत्तम कामगिरी, अभ्यासोत्तर उपक्रम तसेच संशोधन प्रबंध/ थिसिस सादरीकरण यांचा गौरव करण्यात आला आहे.
तामिळनाडू सरकारच्या कामगार कल्याण आणि कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. कुमार जयंत भा.प्र.से. आणि एमडी, मायक्रोबायोलॉजीचे सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, तामिळनाडू येथील नोडल अधिकारी (ई-गव्हर्नन्स) डॉ. पी. षण्मुगप्रिया यांनी या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती दर्शवली. याखेरीज विविध क्षेत्रांमधील वैद्यकीय अधिकारीदेखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी देशाच्या उगवत्या मेडिकल टॅलेंटचा गौरव केला.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी ६० टक्के विद्यार्थी महिला होत्या. त्यातून वैद्यकीय क्षेत्रात लिंगाधारित वैविध्यपूर्णता आणि सर्वसमावेशकता यांच्याबाबत कार्यक्रमाच्या वचनबद्धतेवर भर देण्यात आला. त्याचबरोबर महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांचा विकास करण्याच्या सरकारी प्रयत्नांना मदत म्हणून या जिल्ह्यांमधील सुमारे ६० विद्यार्थी निवडण्यात आले. त्यामुळे सामाजिक विकास आणि संधींना समान पोहोच यांच्याप्रति उपक्रमाची वचनबद्धता दिसून आली.
संपूर्ण निवड प्रक्रियेचे व्यवस्थापन डेलॉइटकडून केले जाते आणि त्यात शिष्यवृत्तीचे प्राप्तीकर्ता निवडण्यासाठी एका सखोल आणि स्पर्धात्मक प्रक्रियेचा वापर केला जातो. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील ख्यातनाम परीक्षक संशोधन अनुदानाबाबत उमेदवारांचे मूल्यमापन करतात आणि संशोधन व नावीन्यपूर्णतेची संस्कृती या माध्यमातून जोपासली जाते.
या कार्यक्रमाबाबत बोलताना मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुरेंद्रन चेमेनकोट्टील म्हणाले की, “भारतात आरोग्यसेवा व्यावसायिकांना मोठी मागणी आहे. परंतु आर्थिक ताण आणि कौशल्यातील अंतर यांच्यामुळे अनेक महत्त्वाकांक्षी वैद्यकीय विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. मेट्रोपोलिस फाऊंडेशनच्या मेडएंगेजचे उद्दिष्ट आर्थिक मदत आणि संधी देऊन ही दरी सांधण्याचे आहे. आमची शिक्षण आणि वैविध्यपूर्णतेप्रति असलेली वचनबद्धता कार्यस्थळावरील कमतरता दूर करून अधिक सर्वसमावेशक भविष्याच्या निर्मितीसाठी आहे. आम्ही नावीन्यपूर्णतेवर आधारित काम करून रूग्णसेवेत सुधारणा करण्यासाठी, तसेच समाजाचे आरोग्यमान सुधारण्यासाठी तरूण पिढीला प्रोत्साहन देतो.”
मेट्रोपोलिस फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. दुरू शाह म्हणाले की, “मेडएंगेज स्कॉलरशिप प्रोग्राम भविष्यातील आरोग्यसेवा तज्ञांना सक्षम करून एक सुदृढ आणि अधिक आरोग्यदायी समाजाची निर्मिती पुढील पिढ्यांसाठी करत आहे. संपूर्ण देशभरातून तरूण वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून आलेला प्रचंड प्रतिसाद पाहणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या वर्षी २९ राज्यांमधून ६०९ शहरांमधील सरकारी तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील ६०१९ अर्ज प्राप्त झाले आहेत. या उपक्रमाद्वारे आम्ही शैक्षणिक व्याप्ती तर सुधारत आहोतच पण त्याचबरोबर बुद्धिमान विद्यार्थ्यांना आरोग्यसेवा संशोधन आणि नावीन्यपूर्णतेत नवनवीन टप्पे पार करत असताना अमूल्य सहकार्यदेखील देत आहोत.”
मेट्रोपोलिस हेल्थकेअरच्या मुख्य वैज्ञानिक अधिकारी आणि सीएसआरच्या समूह प्रमुख डॉ. किर्ती चढ्ढा म्हणाल्या की, “मेडएंगेज आमच्या मेट्रोपोलिसमधील मोहिमेचे प्रतीक आहेः आम्ही आरोग्यसेवेच्या भवितव्याला मार्गदर्शन, आधार आणि प्रेरणा देतो. हा आमच्या अध्यक्षांचे स्वप्न आणि वचनबद्ध सीएसआर प्रयत्नांचा परिपाक आहे. आमच्या सर्व मेहनती वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी हा एक आशेचा किरण असून त्यांच्या विशेष गरजांच्या पूर्ततेसाठी आम्ही प्रयत्न करत असतो. सर्वेक्षण आणि मुलाखतींच्या माध्यमातून डेटा गोळा करून आम्ही आमचा सपोर्ट त्यानुसार तयार करतो. डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे आम्ही संपूर्ण देशभरात आमची पोहोच वाढवत आहोत आणि भारतातील आरोग्यसेवेचे मजबूतीकरण व सर्वसमावेशकता वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.”
मेडएंगेज स्कॉलरशिप प्रोग्राम पात्र विद्यार्थ्यांना फक्त आर्थिक मदतच देत नाही तर मेट्रोपोलिसच्या देशभरातील अद्ययावत प्रयोगशाळांद्वारे तज्ञ मार्गदर्शनाखाली अनुभव आणि ज्ञानदेखील दिले जाते. मेडएंगेज ऑब्झर्वशिप प्रोग्राम्स, एकेडमिक रिसर्च सपोर्ट, लॅबोरेटरी टूर्स, इंटर्नशिप्स आणि मेडटेक वेबिनार्सद्वारे विविध प्रकारच्या संधी देते, ज्या आमच्या तरूण मेडिकल टॅलेंट्सचा शैक्षणिक प्रवास समृद्ध करण्यासाठी तयार केल्या गेल्या आहेत. मेडएंगेजबाबत अधिक माहितीसाठी भेट द्या: www.med-engage.com.
************************************************************************************************
मेट्रोपोलिसच्या मेडएंगेज प्रोग्रामच्या माध्यमातून ३०१ वैद्यकीय विद्यार्थ्यांना १.७ कोटी रूपयांच्या शिष्यवृत्ती आणि संशोधन अनुदान प्रदान ~जवळपास ६० टक्के शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या महिला आहेत ~ ~भारतातील २९ राज्यांमधील ६०३ शहरांमधून ६०१९ अर्ज प्राप्त ~ ~ १५०+ अर्ज महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमधून ~
RELATED ARTICLES


