पुणे, दि. 27: चारचाकी खासगी वाहनाकरिता एमएच 12-झेड एल या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन आरक्षित करण्याकरिता 28 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून फेसलेस सुविधा सुरु होणार आहे; ऑफलाईन पद्धतीने पसंती क्रमांक शुल्क स्वीकारले जाणार नाहीत, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
पसंती क्रमांक आरक्षीत करण्याकरिता https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर, नाव व आधार संलग्नित मोबाईल क्रमांक टाकून नाव नोंदणी करावी व त्यानंतर अर्ज व शुल्क भरणा करून पसंती क्रमांक आरक्षित करता येईल, असेही कळविले आहे.
00000


